सायनमध्ये ११ लाख ८५ हजार संशयित रक्कम पकडली

सायनमध्ये ११ लाख ८५ हजार संशयित रक्कम पकडली

निवडणूका सुरू असल्याने निवडणूक आयोग, आयकर विभाग, उत्पादन शुल्क तसेच पोलीस यंत्रणा संशयित हालचालींवर लक्ष ठेवून आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सायन येथे ११ लाख ८५ हजार रुपये संशयितरीत्या घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबई शहर जिल्हयात सायन भागात काल रात्री निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाव्दारे ११ लाख ८५ हजार संशयित रक्कम पकडली. याबाबत अधिक तपास सुरु आहे. बुधवार रात्री सुमारास सायन कोळीवाडा परिसरात विधानसभा मतदारसंघातील संजय नारायन वारंग यांच्या क्र.३ या फिरत्या तपासणी पथकाने सायन हॉस्पिटल जवळील सिग्नलवर पाहणी केली.

ही पाहणी करीत असताना, त्यांनी लाल रंगाच्या रेनॉल्ट डस्टर या मोटार कारची (एम.एच.४७ ए.बी.६५५९) तपासणी केली. या गाडीमध्ये दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह आणि अनुराग कुमार शाह या तीन व्यक्ती होत्या. त्यांच्याकडे ११ लाख ८५ हजार रुपये रक्कम आढळून आली.

याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले, असुन आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत. अशी माहिती ३० मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.

First Published on: April 18, 2019 4:46 PM
Exit mobile version