मेट्रो ३ चे कारशेड कांजुरला होणार – मुख्यमंत्री

मेट्रो ३ चे कारशेड कांजुरला होणार – मुख्यमंत्री

विधानसभा निवडणूकीआधी आम्ही मेट्रोचा मुद्दा हाती घेतला होता. अनेक पर्यावरणवाद्यांनी आरेतील वृक्ष छटाईचा मुद्दा एरणीवर आणला होता. आरे कारशेडला विरोध केला होता. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने कुलाबा वांद्रे सीप्झ हे मेट्रो ३ साठीचे कारशेड हे कांजुरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना जाहीर केले. आरे कारशेडला विरोध करणाऱ्या आंदोलकांविरोधातील गुन्हेदेखील सरकारने मागे घेतले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही सरकार म्हणून शनिवारी निर्णय घेतला की आरे एवजी आता कारशेड कांजुरमार्गला होईल. त्याठिकाणची जागा ही सरकारी असून त्यासाठी कोणताही खर्च येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आरे कारशेडच्या जागेसाठी खर्च हा १०० कोटींच्या घरात झाला आहे. त्याठिकाणी उभ्या राहिलेल्या इमारतीचा वापर करणार आहोत. तसेच आरे कारशेडसाठी आता कांजुरची जागा वापरत आहोत, ही सरकारची जमीन आहे. त्यामुळेच नवे कारशेड हे कांजुरला बांधण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी जमीन जनतेच्या हितासाठी वापरतो आहोत असे त्यांनी सांगितले.

कांजुरला जागा निश्चित केली आहे, प्राप्त करण्यासाठी पैसा लागणार नाही असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या संपुर्ण निर्णय प्रक्रियेत उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन खात्याची जबाबदारी असणाऱ्या आदित्यने मेहनत घेतली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मेट्रोचे प्रशासकीय यांनी आपुलकीने या कामासाठी लक्ष घालत कांजुरच्या पर्यायाची निवड करण्यासाठी मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचीही फिरकी

उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या निमित्ताने होणाऱ्या खर्चाबाबत विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या टिकेवरही सडेतोड अशी उत्तर दिली. खर्चाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा उपस्थित करत पावसाळी अधिवेशनात आरेचा मुद्दा मांडला होता. जनतेचा पैसा जास्त प्रमाणात वापरला जाईल असा आक्षेप त्यांनी आरे कारशेडची जागा बदलण्याच्या मुद्द्यावर घेतला होता. पण कांजुर येथील कारशेडच्या जागेसाठी मात्र कोणताही खर्च सरकारला येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सरकारी जमीनीचा वापर हा जनतेच्या हितासाठी करत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचवेळी फडणवीस सरकारच्या काळातील कोट्यावधी वृक्ष लागवडीचीही फिरकी मुख्यमंत्र्यांनी घेतली. कोट्यावधी वृक्ष लावलेले कुठेच दिसत नाहीत. पण जे जंगल आहे ते आधी वाचवल आहे असाही चिमटा मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढला. आरे कारशेड कांजुरला हलवून जंगल जपल्याच समाधान असल्याचेही ते यावेळी म्हणाले.


 

First Published on: October 11, 2020 1:53 PM
Exit mobile version