Corona Vaccination: मुंबईत ४५ आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद

Corona Vaccination: मुंबईत ४५ आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद

अपुऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरण केंद्र ९ जुलैपर्यंत बंद

मुंबईत अद्यापही लसीचा तुटवडा कायम आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेने फक्त ४५ आणि त्यावरील नागरिकांना लस न देण्याचा निर्णय घेतला आहे. ४५ आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण ३ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कोविन ॲपद्वारे नोंदणी झालेल्या नागरिकांनीच लसीकरण केंद्रावर यावे, इतरांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

केंद्र सरकारकडून मुंबईसाठी लसीचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने आणि लसीकरणासाठी आवश्यक साठा उपलब्ध नसल्याने मुंबई महापालिकेने शासकीय, महापालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर सोमवार ३ मे रोजी ४५ वर्षे आणि त्यावरील वयोगटाचे लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्याच्या पद्धतीप्रमाणे नियोजित ५ केंद्रांवर सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ज्यांची कोविन Appमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेला आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या स्वरुपात गर्दी करत आहेत. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊ नेय. पालिका प्रशासनाकडून लस उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळविण्यात येणार आहे. वास्तव नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे, मुंबई महापालिकेच्या नियोजित ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ते ३ मे रोजी देखील सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत सुरू राहील. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे.

५ लसीकरण केंद्राची नावे

१) बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).

२) सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)

३) डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

४) सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

५ ) वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

First Published on: May 2, 2021 9:50 PM
Exit mobile version