मध्य आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांच्या जेवणाची चव जाणार

मध्य आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांच्या जेवणाची चव जाणार

मध्य आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांच्या जेवणाची चव जाणार

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढ नये, याकरता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकाडाऊनच्या काळात अत्यावाश्यक सेवा सोडून इतर सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची अत्यावश्यक सेवा असलेले मेडिकल, डॉक्टर आणि किराणा स्टोअर्स सुरु आहेत. मात्र, असे असले तरी देखील नागरिकांनी भीती पोटी सर्व किराणा सामान आधीच भरुन ठेवले. त्यामुळे आता मुंबईमध्ये किराणा मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या पॅकबंद मिठाचा तुटवडा भासत आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईतील बहुतांश किराणा दुकानांमध्ये दोन दिवसांपासून मीठ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या जेवणाची चव देखील जाणार आहे.

लॉकडाऊन घोषित केल्यामुळे अनेकांनी मीठ सोडून इतर सर्व घर सामान भरले. मात्र, मीठ घेण्याचे कोणाच्या लक्षातच आले नाही. परंतु, आता मीठ संपत असल्याचे लक्षात आल्यानंतर बाजारात धाव घेतल्यावर बाजारातून मीठ गायब झाल्याचे निदर्शनास आले. मध्य आणि दक्षिण मुंबईतील बहुतांश किराणा दुकानांमध्ये मीठाचा तुटवडा जाणवू लागला आहे. घाऊक विक्रत्यांकडे साठा आहे. मात्र, मालाची चढउतार आणि ने आण – करण्यसाठी कामगार नसल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे विक्रेते सांगतात. तसेच नामांकित कंपन्यांऐवजी कधी बााजारात न पाहिलेल्या कंपन्यांचे मीठ दुकानदार पुढे करत आहेत. ताडदेवसारख्या काही भागात तर सुटे जाडे मीठ लोकांना घ्यावे लागत आहे.

माल मुबलक प्रमाणात आहेत

मिठाचा साठा घाऊक बाजारात तसेच घाऊक वितरकांकडे मुबलक प्रमाणात आहे. मात्र, माथाठी कामगार नाहीत, ही समस्या आहे. त्यातच जे दररोजच्या मजुरीवर काम करणारे मजुर होते, ते गावी निघून गेले आहेत. त्यामुळे मालाची चढ – उतार करण्यासाठी माणसे नसल्यामुळे ही वेळ आली आहे.


हेही वाचा – ‘Coronavirus हे सरकारी षडयंत्र’ अशी फेसबुक पोस्ट करणाऱ्याला मुंबईत अटक


First Published on: April 6, 2020 10:06 AM
Exit mobile version