खाकी वर्दीतल्या अधिकाऱ्याने जपली सामाजिक नाळ

खाकी वर्दीतल्या अधिकाऱ्याने जपली सामाजिक नाळ

देशातल्या कोरोनाविरोधातील लढाईत एकीकडे कोरोना योद्धयांनी रात्रीचा दिवस केला आहे. त्यामध्ये पोलिसांचाही वाटा तितकाच महत्वाचा आहे. आपल्या खाकीतील वर्दी चोखपणे करतानाच सामाजिक भान राखण्याचाही एक प्रयत्न अशाच एक वर्दीतल्या रक्षकाकडून झाला आहे. आपल्या गावाकडची नाळ कायम ठेवत या खाकीतल्या अधिकाऱ्याने रोजंदारी बुडालेल्या, निराधार, गरीब आणि गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

राखले सामाजिक भान

वसई पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असणारे श्रीकांत करांडे यांनीही सध्या कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवताना गरजूंना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. जुजारपुर, गुणापवाडी, साहेबाचीवाडी, करांडेवाडी यासारख्या गावांमध्ये जवळपास २०० गरजूंना अन्नधान्याचा, साबण, बिस्किट, तेल अशा गोष्टींचा पुरवठा त्यांनी केला आहे. ते स्वतः मुंबईत असले तरीही त्यांचे वडील मेजर शिवाजी करांडे, चुल्ते तानाजी करांडे आणि भाऊ गणेश करांडे तसेच माजी सरपंच मंगलताई करांडे यांनी गावोगावी जाऊन गरजूंना ही मदत पोहोच केली आहे. कोरोनाच्या काळात अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तसेच हाताला काम नाही अशा लॉकडाऊनच्या काळात ही मदत मिळाल्याने लाभार्थींनीही त्यांचे आभार मानले आहेत. याआधीही श्रीकांत करंडे यांनी मदतीचा हात पुढे करत वेळोवेळी विविध संकटात स्थानिक पातळीवर ग्रामस्थांना मदत केली आहे.


हेही वाचा – खुशखबर! राज्यातील बळीराजाला मिळणार दिलासा; एसटीतून होणार माल वाहतूक


 

First Published on: May 22, 2020 10:13 PM
Exit mobile version