काय सांगताय? बायकोशी पटत नसेल तर नवऱ्याने दुसरीकडे रहावे

काय सांगताय? बायकोशी पटत नसेल तर नवऱ्याने दुसरीकडे रहावे

बायकोशी पटत नसेल तर नवऱ्याने दुसरीकडे रहावे

नवरा-बायकोमध्ये वाद होणे ही सामान्यबाब आहे. कारण संसार म्हटला का वाद हे होतातच. मात्र, बऱ्याचदा हे वाद टोकाला जातात आणि नवरा-बायको विभक्त राहू लागतात. मग पत्तीला कायद्यानुसार विभक्त राहू लागलेल्या पत्नीला घरभाडे द्यावे लागते. पण, घरभाडे देणे म्हणजे तिला न्याय मिळाला का?, असे म्हणता येणार नाही. संसार करताना जर बायकोशी पटत नसेल तर पतीनेही दुसरीकडे भाड्याच्या घरात राहायला काय हरकत आहे, असे महत्त्वपूर्ण मत दिंडोशीतील सत्र न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले आहे.

सामाईक घरावर पती-पत्नी दोघांचाही हक्क

एका ४५ वर्षीय महिलेने तिच्या पतीविरोधात कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली होती. यासाठी तिने दिंडोशी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. त्यात तिने असे म्हटले होते की, ‘पती मला घरात राहण्यास मनाई करत आहे. तसेच मला माझ्या मुलांना भेटण्यास देखील देत नाही. त्यामुळे मला पोटगी मंजूर करण्याबरोबरच घरामध्ये राहण्यास परवानगी द्यावी’, अशी विनंती महिलेने केली होती. तिच्या याचिकेवर न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला दरमहा दोन हजारांची पोटगी आणि पाच हजारांचे घरभाडे मंजूर केले होते. मात्र, तिला समाईक घरामध्ये राहण्यास परवानगी नाकारली गेली.

सत्र न्यायालयाचे मत

‘नवरा-बायकोमध्ये खटके उडाल्यानंतर घर सोडून गेलेल्या बायकोला स्वतंत्र राहण्यासाठी घरभाडे दिले जाते. जर असे होत असेल तर पती स्वत:च घर सोडून स्वतंत्र ठिकाणी भाड्याने राहायला का जाऊ शकत नाही. केवळ महिलेला घराबाहेर स्वतंत्र राहण्यासाठी घरभाड्याची रक्कम देणे म्हणजे न्याय देणे’, असे होत नाही. – एस. यू. बघेले, अतिरिक्त सत्र न्यायाधीश


First Published on: January 11, 2021 2:35 PM
Exit mobile version