मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकातील ‘राणा’चं निधन; पोटाच्या विकाराने होता त्रस्त

मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकातील ‘राणा’चं निधन; पोटाच्या विकाराने होता त्रस्त

मुंबई – मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील एका श्वानाचं निधन झालं आहे. राणा असं या श्वानाचं नाव असून तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तो अवघा सात वर्षे सात महिन्याचा होता. पोलिसांचा त्याच्यावर अतुट विश्वास होता, त्यामुळे त्याच्या निधनाने पोलिसांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रात आढळला जीवघेणा स्क्रब टायफस आजार, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

राणा २०१६ मध्ये मुंबई पोलिसांच्या श्वानपथकात दाखल झाला होता. स्फोटकं शोधण्याचं प्रशिक्षणही त्याने घेतलं होतं. तो लॅब्रोडॉर जातीचा श्वान असून बॉम्ब कॉल, थ्रेट कॉल, संशयित वस्तू तपासण्याचं काम त्याने केलं आहे. व्हीव्हीआयपी, व्हीआयपी यांची मुंबई भेटीदरम्यान घातपातविरोधी तपासणी करणं, संवेदन ठिकाणांची नियमित तपासणी करणं, अशा घातपातविरोधी तपासणीमध्ये त्याचा सहभाग असायचा. त्यामुळे त्याच्या निधनाने बॉम्बशोधक पथकात त्याची उणीव निर्माण झाली आहे.

हेही वाचा – दहीहंडीच्या पंढरीकडे गोविंदा पथकांची पावलं, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उत्साह शिगेला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “राणा आहे म्हणजे निर्धास्त राहू शकतो, असा पोलिसांना विश्वास आसायचा. त्याने अनेक मोहिमा यशस्वी केल्या. राणाला पोटाचा विकार झाल्याने त्याच्यावर परळच्या बाई साकराबाई पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. राणावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.”

 

First Published on: August 19, 2022 11:10 AM
Exit mobile version