महाराष्ट्रात बाल मृत्यू दर आणि नवजात बालकांच्या मृत्यू दरात घट

महाराष्ट्रात बाल मृत्यू दर आणि नवजात बालकांच्या मृत्यू दरात घट

नवजात बालकांच्या मृत्यू दरात घट

अहवालात ५ वर्षाखालील बालकांच्या मृत्यू दरात आणि नवजात बालकांच्या मृत्यूदरात घट आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रणी राहिले आहे. २०१५ च्या आधाराभूत माहितीनुसार राज्यात ५ वर्षाखालील बालकांच्या मृत्यू दराचे प्रमाण १००० बालकांमागे २४ होते. हे प्रमाण घटून २०१६ च्या आधाराभूत माहितीनुसार १००० बालकांमागे २१ एवढे झाले आहे. जन्मापासून ते २८ दिवसांपर्यंतची बालके नवजात बालक म्हणून गणली जातात. राज्यात २०१५ च्या आधाराभूत माहितीनुसार नवजात बालकांच्या मृत्यू दराचे प्रमाण १००० बालकांमागे १५ एवढे होते यात घट होवून २०१६ च्या आधाराभूत माहितीनुसार १००० बालकांमागे १३ एवढे झाले आहे. या अहवालानुसार राज्यात जन्मदराचे प्रमाण स्थिर असल्याचे दिसून आले. २०१५ च्या आधारभूत माहितीनुसार जन्मदराचे प्रमाण १.८ एवढे होते. २०१६ च्या आधाराभूत माहितीनुसार जन्मदराचे प्रमाण १.८ एवढे कायम असल्याचे अहवालात नमूद आहे.

संस्थात्मक बाळंतपणात वाढ

महाराष्ट्रात संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाली असून परिणामी बाल आणि माता मृत्यूदरात घट झाली आहे. अहवालात नमूद २०१५-१६ च्या आधारभूत माहितीनुसार संस्थात्मक बाळंतपणाचे प्रमाण ८५.३ एवढे होते. २०१७-१८ च्या आधाराभूत माहितीनुसार संस्थात्मक बाळंतपणाचे प्रमाण ८९.८ एवढे वाढल्याचे अहवालात नमूद आहे.

जिल्हा वैद्यकीय अधिका-यांची उपलब्धता लक्षणीय

आरोग्य विभागाच्या योजना आणि कार्यक्रमांची जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक असते. यात महाराष्ट्राची स्थिती सुधारली असून राज्यात २०१३-१६ च्या आधारभूत माहितीनुसार मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या स्थिर कालावधीचे प्रमाण १५.६ एवढे होते. २०१५-१८च्या आधाराभूत माहितीनुसार हे प्रमाण १७.४ एवढे वाढले आहे.

First Published on: June 25, 2019 10:57 PM
Exit mobile version