देशभरातील अँटिक उपकरणं मुंबईत, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दुर्मिळ संधी!

देशभरातील अँटिक उपकरणं मुंबईत, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दुर्मिळ संधी!

सी. व्ही. रमण

भारतासह जगभराला रमन इफेक्टची ओळख करून देणारा 190 हून अधिक वर्षे जुना दुर्मिळ स्पेक्ट्रोमीटर मुंबईतील विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. एकुण सहा दुर्मिळ आणि अॅन्टीक अशी उपकरण पाहण्याची संधी नेहरू विज्ञान केंद्रातील प्रदर्शनात पाहता येतील. इलुमिनेटींग इंडिया 5000 इयर्स ऑफ सायन्स एण्ड इनोव्हेशन ही प्रदर्शनाची थीम आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ही सगळी एंटीक आणि दुर्मिळ उपकरणांच प्रदर्शन पहिल्यांदाच नेहरू विज्ञान केंद्रात भरवण्यात येत आहे.

उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी सहजपणे दिसत नाही अशा गोष्टींचा शोध घेण्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपीच योगदान महत्वाच आहे. 1928 साली किंवा त्याआधी हा स्पेक्ट्रोमीटर तयार करण्यात आला होता. या स्प्रेक्ट्रोमीटरच वैशिष्ट्य म्हणजे सहा वेगवेगळ्या भागात हा विभागण्यात आला होता. स्पेक्ट्रोमीटरचे पहिले पाच भाग हे लाकडात बसवण्यात आलेले आहेत, तर स्पेक्ट्रोमीटर हा स्वतंत्र आहे. सद्यस्थितीला हा स्पेक्ट्रोमीचर चालु स्थितीत नाही. कारण स्पेक्ट्रोमीटरचे काही भाग हे हरवलेल्या स्थितीत आहेत. रमन यांच्या संशोधनासाठी त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. सध्या हा स्पेक्ट्रोमीटर इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स या संस्थेच्या अखत्यारीत आहेत.

क्रेसकोग्राफ
जगदीश चंद्र बोस यांच्या वनस्पती शास्त्रातल्या संशोधनासाठी उपयुक्त असा क्रिसकोग्राफदेखील पाहता येणार आहे. वनस्पतींची वाढ कशा पद्धतीने होते याचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी हे उपकरण महत्वाच अस योगदान देणार होत. हे उपकरण आचार्य भवन, कोलकाता यांच्या अखत्यारीत आहे.

थेडोलाईट
मुव्हेबल टेलिस्कोपचा वापर करून ठराविक अंतर मोजण्यासाठी थेडोलाईटचा वापर करण्यात आला. 200 वर्षापूर्वीच या उपकरणाचा शोध लागला होता, पण सर्वात अद्ययावत अशा स्वरूपातील उपकरण मानल जात. 1830 मध्ये हे उपकरण वापरात आले. 19 व्या शतकात थेडोलाईटचा वापर करून भारतीय उपखंडात या उपकरणाच्या माध्यमातून सर्वेक्षणाला सुरूवात झाली. लॅम्बटन आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी या सर्वेक्षणासाठी पुढाकार घेतला होता. जगातल सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्याच आव्हानात्मक कामही याच उपकरणाचा वापर करून झाले. त्यांच्या या योगदानासाठीच पुढे या शिखराला एव्हरेस्ट हे नाव देण्यात आले. महत्वाच म्हणजे आजही हे उपकरण वापरात आहे.

70 वर्षांचा नकाशा
भारतात ब्रिटींशांच्या राजवटीत भारतीय उपखंडाचा नकाशा तयार करण्याचे काम करण्यासाठी हे उपकरण वापरून 70 वर्षे इतका कालावधी लागला. सध्या हे उपकरण इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सर्व्हे एण्ड मॅपिंग, सर्व्हे ऑफ इंडिया, तेंलगणा यांच्या अखत्यारीत आहे. 1802 मध्ये या सर्वेक्षणाला सुरूवात झाली होती. शंभरहून अधिक लोकांचा या सर्वेक्षणात सहभाग होता.

स्पेक्ट्रोमीटर, थेडोलाईट यासारख्या उपकरणांसोबतच कम्पेंसेशन बार, कम्पाऊंड लिव्हर क्रेस्कोग्राफ, ऑसिलेटींग प्लेट पायथोग्राफ, रामदेन्स 100 फीट चैन यासारख्या उपकरणांची माहितीही या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळणार आहे. वरळीच नेहरू विज्ञान केंद्रात 11 मे ते 13 मे या कालावधीत हे प्रदर्शन पाहता येईल. भारत इंग्लंड संबंधांना 70 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. इंडियन असोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ सायन्स (कोलकाता), सर जे. सी. बोस ट्रस्ट (कोलकाता), सर्व्हे ऑफ इंडिया (देहरादून) यांच्या अखत्यारीत ही उपकरण आहेत.

First Published on: May 10, 2018 1:05 PM
Exit mobile version