एकाच कुटुंबाने गमावले दोघे जण; मुलांच्या डोक्यावरुन हरपले आईचे छत्र

एकाच कुटुंबाने गमावले दोघे जण; मुलांच्या डोक्यावरुन हरपले आईचे छत्र

मुंबई : डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

भायखळ्याच्या डोंगरी परिसरात सकाळी साडे अकराच्या सुमारास एका इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण ११ जण जखमी झाले असून यात पाच जणांचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. २५ वर्षीय साबिया निसार शेख आणि ५५ वर्षीय अब्दुल सत्तार शेख या दोघांचा या घटनेत जीव गेला आहे. साबियाच्या जाण्याने या घरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमके काय घडले?

साबियाला एक ३ वर्षीय मुलगा आणि तीन महिन्यांची मुलगी आहे. या दोन्ही मुलांच्या डोक्यावरुन मायेचं छत्र हरपलं आहे. साबियाचं सहा वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. ही सर्व माहिती देताना साबियाचे मामा इब्राहिम तुरानी यांचे डोळे गहिवरले. तर अब्दुल सत्तार हे डेकोरेटर होते. ते कामावर जायला निघाले होते. त्यांना काहीतरी गडबड होतेय हे कळल्यावर ते घराबाहेर पळण्याचा प्रयत्न करत होते. पण, तोपर्यंत त्यांच्या अंगावर अख्खं घर कोसळलं.

साबियाच्या मुलीचं नाव आयेशा आणि मुलाचं नाव अब्दुल असून त्यांच्यावर सध्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अब्दुल सत्तार यांची पत्नी सलमा शेख हिच्या कानाला मार लागला असून तिच्यावर सध्या काननाकघसा या विभागात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Dongri Bulding Collapse : दुर्घटनास्थळी नेत्यांची लटांबरं हवीत कशाला?

हेही वाचा – DongriBuildingCollapse : ‘याचा धोकादायक इमारतीच्या यादीत समावेश नव्हता’


First Published on: July 17, 2019 6:00 AM
Exit mobile version