डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण … आणि तिघींचा संयम सुटून तिघीही भरकोर्टात रडल्या

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण … आणि तिघींचा संयम सुटून तिघीही भरकोर्टात रडल्या

डॉ. पायल तडवी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या तिन्ही डॉक्टरांना सोमवारी विशेष सत्र न्यायलयात हजर कऱण्यात आले होते, त्यांच्या जामिनावर देखील आज सुनावणी होणार होती. परंतु त्यांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात येताच तिघीचा संयम सुटला आणि तिघींची कोर्टरूममध्ये रडारड करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांची वकिलांनी समजूत काढल्यानंतर तिघी शांत झाल्या. या प्रकरणाची सुनावणी व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी तडवी कुटुंबियांच्या वकिलांनी केली आहे. न्यायालयाने १७ जूनपर्यंत या तिघींच्या जामिन अर्जावरील सुनावणी तहकूब केली आहे.

कोर्टात व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींची न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी संपली होती. तसेच तिघीच्या जामीन अर्जावर देखील सोमवारी सुनावणी होणार होती. या तिघींना सोमवारी दुपारी विशेष स्तर न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तडवी कुटुंबियाच्यावतीने वकील सदावर्ते यांनी हे प्रकरण अट्रॉसिटीचे असल्याने याची सुनावणी व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली. कोर्टाने ही विनंती मान्य करत पोलीस तसेच कोर्ट कर्मचाऱ्यांना कोर्टात व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष न्यायालयाने या तिघीही न्यायालयीन कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करून या तिघींच्या जामीन अर्जावर १७ जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. १७ जुनपर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगची पूर्तता झाल्यास या अर्जावर सुनावणी करण्यात येणार असून नाहीतर २१ जून रोजी या अर्जावर सुनावणी होईल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. कोर्टाचे हे निर्देश ऐकताच अटकेत असलेल्या तिनही महिला डॉक्टरांचा संयम सुटला आणि ‘जेलसारख्या भयानक ठिकाणी आता राहू शकत नाही, आम्हाला इथून मुक्त करा. आम्ही काहीही केलेले नाही’, आम्हाला त्रास होत आहे, असा टाहो फोडून तिघींनी भरकोर्टातच रडण्यास सुरूवात केली. शेवटी वकिलांनी तिघींना समजावले त्यानंतर काहीवेळाने त्या शांत झाल्या.
डॉ. पायलने  या तिघींच्या छळाला कंटाळून नायर हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी तीन सहकारी महिला डॉक्‍टरांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग, अट्रोसिटी कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान अधिकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास राज्य सरकारने  गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

हेही वाचा – ती परत येणार…! डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येचे दृश्य करणार उभे

पहा – आरोपींना अटक झाल्यानंतर डॉ. पायल यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

First Published on: June 10, 2019 7:06 PM
Exit mobile version