पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला

पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला

दिल्लीत भूकंपाचे धक्के

पालघरमध्ये गुरुवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे हादरे जाणवू लागले. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरीमध्ये प्रामुख्याने भूकंपाचे धक्के जाणवले. काही दिवसांपूर्वीही पालघरमधील डहाणू आणि तलासरी या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या आठवड्यातील शुक्रवारी सकाळी साधारण ७ वाजण्याच्या सुमारास या परिसरात ३. ३ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. पालघरमधील डहाणू आणि तलासरी येथे मागील तीन महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. याआधी २४ जानेवारी रोजी सकाळी ९.१३ आणि ९.१५ वाजता डहाणू तसेच तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. याआधी बसलेल्या भूकंपांची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी अशी नोंदवण्यात आली होती.

पालघरमध्ये ३९ वेळा झाला भूकंप 

गेल्या दोन महिन्यांपासून गडगडाटी आवाज येत असून अजूनही हे आवाज तसेच सुरु असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतचा हा संपूर्ण भाग आदिवासी भाग आहे. त्यामुळे या भागातील पक्क्या घरांच्या भिंतींना, इमारतींना आणि कुडाच्या घरांना कमी-जास्त प्रमाणात तडे गेल्याचं चित्र गेल्या आठवड्यात पाहायला मिळाले. पालघर जिल्ह्यातील डहाणी आणि तलासरी तालुक्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये भूकंपाचे ३९ तसेच ६०० ते ७०० छोटे धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली होती. नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ डिसेंबर ते ६ फेब्रुवारी या कालावधीत भूकंपाच्या झटक्याची रिक्टर स्केल तीव्रता २.१ ते ४.१ इतकी होती.

हेही वाचा –

पालघर जिल्हा भूकंपाने हादरला; स्थानिकांमध्ये भीती

पालघरमध्ये ऐकू आले गूढ आवाज; जाणवले भूकंपाचेही हादरे

भूकंपाच्या भीतीने थंडीतही झोपतात घराबाहेर

First Published on: February 8, 2019 10:14 AM
Exit mobile version