घरमुंबईपालघर जिल्हा भूकंपाने हादरला; स्थानिकांमध्ये भीती

पालघर जिल्हा भूकंपाने हादरला; स्थानिकांमध्ये भीती

Subscribe

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बसलेले धक्के हे सौम्य स्वरुपाचे असल्यामुळे कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही.

पालघरमधील डहाणू आणि तलासरी या भागांत शुक्रवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी साधारण ७ वाजण्याच्या सुमारास या परिसरात ३. ३ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. पालघरमधील डहाणू आणि तलासरी येथे मागील तीन महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. या पार्श्वभूमीवर आज साकाळीही भूकंपाचा धक्का बसला. याआधी २४ जानेवारी रोजी सकाळी ९.१३ आणि ९.१५ वाजता डहाणू व तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. याआधी बसलेल्या भूकंपांची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी अशी नोंदवण्यात आली होती.

भूकंपाची तीव्रता सौम्य 

भूकंपाचे धक्के जाणवलेल्या परिसरातील स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून गडगडाटी आवाज येत आहे. अजूनही हे आवाज तसेच सुरु असल्याचंही स्थानिकांनी सांगितलं. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतचा हा संपूर्ण भाग आदिवासी भाग आहे. त्यामुळे या भागातील पक्या घरांच्या भिंतीना, इमारतींना आणि कुडाच्या घरांना कमी-जास्त प्रमाणात तडे गेल्याचं चित्र आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बसलेले धक्के हे सौम्य स्वरुपाचे असल्यामुळे कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही. तसंच सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -