घरमुंबईपालघरमध्ये ऐकू आले गूढ आवाज; जाणवले भूकंपाचेही हादरे

पालघरमध्ये ऐकू आले गूढ आवाज; जाणवले भूकंपाचेही हादरे

Subscribe

पालघर जिल्ह्यात रविवारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पण भूकंपाच्या हादऱ्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिखले, धुंदलवाडी तसेच तालासरी तालुक्यातील दापचरी व तलासरी शहरात रविवार, ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२५ मिनिटांनी हा धक्का जाणवला. यावेळी नागरिकांना सौम्य हादरे जाणवले. भांडी एकमेकांवर आपटल्याने आवाज आल्याचे सांगण्यात आले. तर ३ नोव्हेंबर रोजी गूढ आवाजाने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील हा परिसर हादरला होता. आठ दिवसातील ही दुसरी घटना समोर आली असून दीड महिन्यांपूर्वीही असेच धक्के जाणवले होते. त्यामुळे आवाज आणि कंपन झाल्याची ही तिसरी घटना असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, डहाणूतील चिखले, धुंदलवाडी तसेच तलासरी तालुक्यातील वंकास, दापचरी, आंबेसरी आदी गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवले. हा भूकंप काही सेकंद राहिल्याची माहिती चिखले गावातील किरण गजानन पाटील यांनी दिली.

हादरा बसल्याने ग्रामस्थ भयभीत

पालघर – डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा, दपचारी, सांसवंद, आंबोली, वरखंडा, वंकास, तर तलासरी तालुक्यातील तलासरी, वडवली, कवाडा, सवणे, कुर्झे, वसा, करंजगाव इत्यादी गावत रविवारी पुन्हा गूढ आवाज होऊन जमिनीला हादरा बसल्याच्या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले. काही ठिकाणी जमीन हादरल्याच्या तर काही ठिकाणी घरांच्या भींतीला तडा गेल्या असून भींतीवरील घड्याळं खाली पडली. तर काही ठिकाणी भांडी, कपाट, खिडकी, दरवाज्याना झटक्याने आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. गूढ आवाज होऊन जोरदार झटका बसल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले. गूढ आवाजाने नागरिकांच्या मनात घर केले असून रविवारी बसलेल्या हादऱ्या नंतर नागरिक रस्त्यावर आले होते.

- Advertisement -

भूकंपाची ही तिसरी घटना 

काही दिवसांपूर्वी म्हणजेच, ३ नोव्हेंबर रोजी गूढ आवजने हा परिसर हादरला होता. त्यानंतर रविवारी संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी गूढ आवाज होऊन जमिनीला हादरे बसल्याने दहा दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहे. मात्र हा भूकंप होता की आणखी स्फोटाचा आवाज होता, याचे कारण कळू शकले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -