Money Laundering : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांवर ED चे छापे, राजकीय नेताही रडारवर

Money Laundering : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांवर ED चे छापे, राजकीय नेताही रडारवर

संग्रहित छायाचित्र

अंमलबजावणी संचलनालया (ED) ने मुंबई आणि परिसरात अंडरवर्ल्ड गॅंगस्टर दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या प्रकरणाशी संबंधित छापेमारी सुरू केली आहे. नुकतीच काही प्रकरणात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या संबंधित प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणाशी संबंधितच ईडी आणि एनआयएचे ही छापेमारी असल्याचे कळते. दरम्यान आज दुपारी शिवसेना भवन येथे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. दुपारी ४ वाजताच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत.

संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्या कोठडीत लवकरच असतील असे विधान केले आहे. त्याआधीच ईडी मुंबईत सक्रीय झाली आहे. मुंबईत दहा ठिकाणी ईडीने सर्च ऑपरेशन सुरू केल्याची माहिती एबीपी माझा या वाहिनीने दिली आहे. ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) या दोन्ही यंत्रणांनी ही संयुक्त छापेमारी केल्याचे कळते. मनी लॉड्रिंग प्रकरणात महाराष्ट्रातील राजकीय नेतेही या प्रकरणात रडारमध्ये येणार असल्याचे कळते.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दाऊद इब्राहीमची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या घरी छापेमारी केल्याचे कळते. मनी लॉंड्रिंग प्रकरणात ही छापेमारी केल्याचे कळते. मुंबईतील अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेल्या लोकांशी संबंधित दहा ठिकाणी छापेमारी झाल्याचे कळते. या प्रकरणात महाराष्ट्रातील एक नेत्याचेही नाव समोर येत आहे. महाराष्ट्रातील एक राजकारण्याचेही नाव या प्रकरणात समोर आले आहे. या तपासामध्ये अंडलवर्ल्डमधील भारत सोडून पळालेले लोक आणि राजकारणी लोकही ईडी आणि एनआयएच्या रडारवर असल्याचे कळते. एनएनआय या वृत्तसंस्थेनेही या संयुक्त मोहिमेवर शिक्कामोर्तब केले आहे.

डी गॅंगचे पंजाब कनेक्शन 

गेल्या काही दिवसांमध्ये दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचे सिंडीकेट हे पंजाबमध्ये आढळून आले होते. पंजाबमध्ये पाकिस्तानच्या ISI च्या मार्फत दहशतवादी कारवायांमध्ये डी कंपनीचा हस्तक्षेपाची वाढ झाल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये उघड झाले होते. पंजाबमध्ये दहशतवादास खतपाणी घालण्यास डी कंपनीचे कनेक्शन आढळून आले होते. तर तपास यंत्रणांनी काही दिवसांपूर्वीच दाऊदचा अतिशय निकटवर्तीय असलेल्या अबु बकरला अटक केली होती. अबु बकरचे कनेक्शन हे १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाशी होते. त्याचा युएई येथून २९ वर्षांनंतर अटक करण्यात आली होती.


 

First Published on: February 15, 2022 10:24 AM
Exit mobile version