काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या सासू ईडी चौकशीच्या जाळ्यात

काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या सासू ईडी चौकशीच्या जाळ्यात

काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम

काँग्रेसचे नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची सासू ईडी चौकशीच्या घेऱ्यात अडकल्याचे समोर येत आहे. विश्वजीत कदम यांची सासू गौरी भोसले यांची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी परदेशात खरेदी केलेल्या मालमत्तेची ईडीकडून चौकशी करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान गौरी भोसले यांच्या अकाऊंटमधून विदेशात प्रॉपर्टी खरेदी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या अकाऊंटमधून काही पैसे विदेशात पाठवण्यात आले होते. याप्रकरणाची चौकशी सध्या ईडीकडून केली जात आहे. २७ नोव्हेंबरला अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. यासंदर्भातील २३ ठिकाणी आयटी डिपार्टमेंटकडून रेड टाकण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी गौरी भोसले यांची मुलगी आणि विश्वजीत कदम यांची पत्नी स्वप्नाली कदम यांची देखील याप्रकरणा संदर्भातील चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती. माहितीनुसार, जवळपास ८ कोटीं ते १० कोटी रूपयांची अवैध मालमत्ता विदेशातील प्रॉपर्टीत गुंतवणूक केली गेली होती. पण आता याप्रकरणात कोणते नवे खुलासा होणार आहेत, हे येत्या काळात समजेल.


हेही वाचा – कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण


 

First Published on: February 2, 2021 6:41 PM
Exit mobile version