ठाण्यात प्लास्टीक कारखान्यात ५२ लाखाची वीज चोरी

ठाण्यात प्लास्टीक कारखान्यात ५२ लाखाची वीज चोरी

वीजमीटरमध्ये फेरफार करुन ५२ लाख ६५ हजारांची वीजचोरी केल्याप्रकरणी ठाणे येथील अबूतालिक शमशुद्दीन खान या प्लास्टीक उत्पादक कारखानदाराला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयाने वीजचोरीच्या रकमेच्या तिप्पट सुमारे सव्वा कोटींचा दंड भरण्याचे आदेशही आरोपीला दिले आहेत.

हेही वाचा – अन्यथा तंत्रज्ञान भस्मासूर ठरेल – प्रा. प्रकाश पाठक

महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने १४ जानेवारी २००४ रोजी ठाण्यातील शीळ, महापे येथील अबूतालिक खान याच्या प्लास्टिक उत्पादक कारखान्याची तपासणी केली असता संबंधित कारखान्याच्या वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. मीटरचे सील तोडून ३४ महिन्यांपासून सुमारे १० लाख ३२ हजार २६ युनिटची वीजचोरी होत असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. वीजचोरीची एकूण रक्कम ५२ लाख ६५ हजार ४३० रुपये होत असल्याने भरारी पथकाने अबूतालिक खान यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विद्युत कलम १३५, १३८ नुसार गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने अबूतालिक खान याला २ वर्ष सश्रम कारावास व सव्वा कोटी रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

First Published on: July 15, 2019 7:30 PM
Exit mobile version