नालासफाईचा दावा एका दिवसात फेल, राम कदम यांची पालिकेवर टीका

नालासफाईचा दावा एका दिवसात फेल, राम कदम यांची पालिकेवर टीका

भाजप आमदार राम कदम

मुंबईसह राज्यात पावसाला सुरुवात झाली असून, दरवर्षी पावसाळ्यात पालिकेतील सत्ताधाऱ्यांना सहन करावा लागत असून, यंदा सुरुवातीलाच नालेसाफाईवरून भाजप आमदार राम कदम यांनी पालिकेवर टीका केली आहे. मुंबईत सुरू झालेल्या पावसामुळे मंगळवारी घाटकोपर येथील नाल्याचे पाणी वस्तीत मोठ्या प्रमाणात शिरल्यामुळे राम कदम यांनी मुंबई महानगरपालिकेचा नालेसफाईचा खोटा दावा एका दिवसात उघडल्याची टीकाही ट्विटरवरून केली आहे. राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओमध्ये नाल्यातील पाणी वस्तीत घुसल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या पाण्यातून दुचाकीही वाहून जाताना दिसत आहे.

आता आम्ही आरोप करतोय म्हणू नका

दरम्यान राम कदम यांनी व्हीडिओ शेअर करताना पालिकेचा नालेसफाईचा दावा एका दिवसात फेल झाला असल्याचं म्हटले असून,आता आम्ही आरोप करतोय असे म्हणू नका अशी टीका देखील सत्ताधाऱ्यांवर केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या डोळ्यांनी हे पाहावं, असं ते म्हणाले. दरम्यान काहींनी हा व्हिडिओ जुना असल्याचे म्हणत विरोधकांवर टीका केली. मात्र, व्हिडीओमधील लोकांच्या चेहऱ्यांवरीला मास्कही दिसू नयेत ? याचं आश्चर्य वाटते. पाऊस कधी आला. करून दाखवलेला प्रताप चव्हाट्यावर येताच अनेकजण तो झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न का करत असल्याची टीकाही राम कदम यांनी केली आहे. दरम्यान, मुंबईच्या नाल्यातील ७० टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

First Published on: June 3, 2020 8:30 PM
Exit mobile version