झिरो कोलेस्ट्रॉल लिहिलेले पदार्थ खातायत; मग ‘ही’ बातमी वाचाच!

झिरो कोलेस्ट्रॉल लिहिलेले पदार्थ खातायत; मग ‘ही’ बातमी वाचाच!

झिरो कोलेस्ट्रॉल लिहिलेले पदार्थ खातायत

झिरो कॉलेस्ट्रॉल छापलेल्या अन्न पदार्थांमध्ये फॅट्सची मात्रा अधिक असल्याचे एफडीएच्या धाडीतून समोर आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाकडून आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या असून तब्बल ६९ लाख किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. एफडीएने लॅबमधून केलेल्या चाचण्यांमधून त्या अन्न पदार्थांमध्ये फॅट्स असल्याचे स्पष्ट झाले.

एफडीएने टाकली धाड

गोरेगाव, पनवेल, भिवंडी, नाशिक या ठिकाणांवरील आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. अशा सहा अस्थापनांमधील हे अन्न पदार्थ असल्याचे एफडीए अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. एकूण ६९ लाख ३४ हजार २३२ किंमतीच्या अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन राज्य मुंबई यांच्या गुप्तवार्ता विभागाने न्यूट्रालाईट फॅट स्प्रेड आणि अमुल लाईट फॅट स्प्रेड या अन्न पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या नामांकित पेढ्यांच्या कोल्ड स्टोरेजवर धाडी टाकून फॅट स्र्प्रेडचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले.

६९ लाख ३४ हजार किंमतीचा साठा जप्त

या अन्न पदार्थांच्या पॅकिंगवर झिरो कोलेस्ट्रॅाल, असे छापलेले होते. पण, प्रत्यक्षात त्या अन्न पदार्थांमध्ये फॅट्स असल्याचे विश्लेषणात दिसून आले. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ मधील तरतुदीचे उल्लंघन केल्याची नोंद करण्यात आली आहे. विशेषतः अन्न पदार्थांच्या लेबलवर असणारे दावे जसे झिरो कोलेस्ट्रोल, लो कोलेस्ट्राल हे जाहिरात अॅडव्हार्टाइजिंग अॅण्ड क्लेम रेग्युलेशन २०१८ परिशिष्टमधील आवश्यक तरतुदींनुसार नसल्याचे दिसून आले आहे. तर फॅट स्प्रेड या अन्नपदार्थांचा एकूण ६९ लाख ३४ हजार २३२ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

२ ते ४ तारखे दरम्यान, राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या उत्पादनांमध्ये सॅच्युरेटेड फॅट प्रमाण अधिक आढळले असून ३५ ग्रॅम एवढे फॅट होते. ज्याचे प्रमाण १.५ ग्रॅम असणे गरजेचे आहे. त्यामुळे या उत्पादनांना जप्त करण्यात आले असून नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यांनतरच या कंपनीवर कारवाई केली जाईल, असेही एफडीए प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – मुंबई मेट्रोच्या दोन मजली कारडेपोचं काम सुरू!


 

First Published on: January 8, 2020 8:12 PM
Exit mobile version