घरमुंबईमुंबई मेट्रोच्या दोन मजली कारडेपोचं काम सुरू!

मुंबई मेट्रोच्या दोन मजली कारडेपोचं काम सुरू!

Subscribe

मुंबई मेट्रोसाठी आरे कॉलनीचा वाद सुरू असताना चेंबूरमध्ये मेट्रोसाठी दोन मजल्यांच्या कारडेपोचं बांधकाम सुरू झालं आहे.

आरे कॉलनीमध्ये कारशेड उभारणीसाठी मोठा विरोध होत असताना तिथल्या कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू झाला आहे. या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारने घेतला आहे. मात्र, असं असताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तिन्ही मार्गिकांसाठी दोन मजल्यांच्या कारडेपोचं काम सुरू केलं आहे. चेंबूरमधल्या मंडाळे येथे हा कारडेपो उभारला जात असून या डेपोमध्ये तब्बल ७१ मेट्रो गाड्या थांबवण्याची क्षमता आहे. एकूण ३१ हेक्टर जागेमध्ये हा कारडेपो तयार होत असून त्याला ‘स्टेट ऑफ द आर्ट कारडेपो’, असं नाव देण्यात येणार आहे. दहिसर ते डी.एन.नगर, डी.एन.नगर ते मंडाळे आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशा तीन मेट्रो मार्गिकांसाठी हा कारडेपो असेल.

अत्याधुनिक सोयींनी सज्ज कारडेपो

मुंबई लोकलवर पडणारा ताण कमी करण्यात मेट्रोची मोठी मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांना जोडण्याचं काम मेट्रोच्या माध्यमातून होणार आहे. भविष्यात नवी मुंबई मेट्रोला देखील मुंबई मेट्रो जोडण्याची योजना आहे. चेंबूरमध्ये होणाऱ्या या कारडेपोमध्ये ७१ गाड्या पार्किंगची सोय असणार आहे. त्यामुळे साडेपाचशेहून अधिक डबे या कारडेपोमध्ये थांबू शकतील. या गाड्यांच्या देखभालीसाठी ९ वर्कशॉप असणार आहेत. तसेच, वापरलेल्या पाण्याच्या पुनर्वापराची देखील सोय या कारडेपोमध्ये असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -