मुंबईच्या कामगार रुग्णालयात अग्नितांडव; ६ मृत्यू; १४७ जखमी

मुंबईच्या कामगार रुग्णालयात अग्नितांडव; ६ मृत्यू; १४७ जखमी

कामगार रुग्णालयाला आग

अग्नितांडवात ६ जणांचा मृत्यू

कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून १४७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेमध्ये ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. तसेच हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अग्निशमन दलाचे जवान जखमी

या घटनेमध्ये अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाच जणांचा मृत्यू

अंधेरीच्या कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील सेव्हन हिल्समध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा कुपर रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आग आटोक्यात

अंधेरीच्या कामगार रुग्णालयाला लागलेली आग आटोक्यात आली आहे. तब्बल तीन तासांने आग नियंत्रणात आली आहे.

१०८ जणांना रुग्णालयात हलवले

आतापर्यंत या घटनेत जखमी झालेल्या १०८ जणांना विविध रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींंवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आगीवर नियंत्रण

अंधेरीच्या कामगार रुग्णालयाला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आग जरी विझली असली तरी देखील मात्र अजूनही रुग्णालयातून आगीचा धूर येत असल्याचे दिसत आहे.

४७ जणांना वाचवण्यात यश

आतापर्यंत ४७ जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. मात्र अजूनही अनेक जण या रुग्णालयात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

आगीत २८ जण जखमी

रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये एकूण २८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांना कूपर आणि ट्रामा रुग्णालयात हलवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरु आहेत.

वॉटर टॅंकर दाखल

घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वॉटर टॅंकर दाखल करण्यात आले आहे. वॉटर टॅंकरच्या आधारे आगीवर नियंत्रण मिळवले जात आहे.

अग्निशमन दलाचा जवान जखमी

या घटनेमध्ये एक अग्निशमन दलाचे जवान झकमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

१५ जणांना बाहेर काढण्यात यश

या आगीच्या घटनेमध्ये ५० हून अधिक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अडकल्याची माहिती समोर आली आहे. काही रुग्णांना शिडीच्याआधाराने बाहेर काढले जात आहे. तर काही रुग्ण स्वत:चा जिव वाचवण्यासाठी रुग्णाच्या बाहेर उड्या घेत आहेत. आतापर्यंत १५ जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवांना यश आले आहे.

अंधेरीच्या कामगार रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. रुग्णालयाच्या इमारतीला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली असून रुग्णालयातून धुराचे लोट दिसून येत आहेत. या परिसरात धुराचे लोट येत असल्याने श्वसनास त्रास होत होऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. या संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. या आगीची लेवल ३ ची असल्याचे समोर आले आहे. तर या घटनेमध्ये अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अडकल्याचे दिसून येत आहे. या रुग्णालयातील काही रुग्णांचे नातेवाईक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीवरुन बाहेर पडत असून यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तर जखमींना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेमध्ये अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. मात्र या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती समोर आली आहे.

 

First Published on: December 17, 2018 4:38 PM
Exit mobile version