भिवंडीत केमिकल गोडाऊनला भीषण आग

भिवंडीत केमिकल गोडाऊनला भीषण आग

दादरमध्ये कापडाच्या दुकानाला आग

भिवंडीच्या दापोडा येथील एका केमिकल गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, आग अजूनही धुमसत आहे. या आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही. गेल्या दहा ते बारा तासापासून ही आग धुमसत आहे. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.


हेही वाचा – MTNLच्या आगीत अग्निशमन दलाचा रोबो कुचकामी?

First Published on: July 23, 2019 9:49 AM
Exit mobile version