घरमुंबईMTNLच्या आगीत अग्निशमन दलाचा रोबो कुचकामी?

MTNLच्या आगीत अग्निशमन दलाचा रोबो कुचकामी?

Subscribe

सोमवारी मुंबईत वांद्र्याच्या एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन विभागाने नुकताच घेतलेल्या रोबोकडून अपेक्षित अशी कामगिरी न झाल्यामुळे हा रोबो कुचकामी ठरल्याचं बोललं जात आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलात एक कोटी खर्चून रोबो दाखल झाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी उतरवले असता हा रोबो कुचकामी ठरला असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच या रोबोचे लोकार्पण झाले. या रोबोमुळे अडगळीतील आग विझवण्यासाठी जवानांना स्वत:चा जीव धोक्‍यात घालण्याची गरज भासणार नाही. तसेच रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने रोबो आग नियंत्रित करून ती विझवण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगण्यात आले होते. अग्निशमन दलात रोबो दाखल होण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.


वाचा सविस्तर – वांद्रे येथील MTNL च्या इमारतीला आग; ८४ जणांची सुखरुप सुटका

कॅमेऱ्याचं चित्रीकरण अस्पष्ट

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला सोमवारी लागलेल्या आगीत रोबोचा कॅमेरा पुरेसा स्पष्ट चित्रण करणारा नसल्याने आग विझविताना अडचणी येत होत्या. मात्र अग्निशमन जवानांनी जीवाची बाजी लावत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल जवानांचे कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

Fire Brigade Robot

कसा आहे हा रोबो?

या रोबोची किंमत सुमारे एक कोटी रुपये असून त्याचं वजन सुमारे ४०० ते ५०० किलो आहे. रोबोतील थर्मल कॅमेरा धुरातही सर्व स्पष्ट दाखवू शकतो. उष्ण तापमानात रोबो स्वत:चे संरक्षण करणे शक्य असणार आहे. तसेच पाण्याचे पाईप ओढणे, आग विझवणे आदी अडथळे दूर करणारा असेल असे सांगण्यात आले. विमान बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम पत्र्याच्या सहाय्याने रोबोची निर्मिती करण्यात आली असून ७०० अंश सेल्सिअसच्या तापमानातही हा रोबो करणार काम करणारा आहे. ५५ मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करण्याची त्याची क्षमता असून ३०० मीटरपर्यंत रिमोटद्वारे रोबोवर नियंत्रण करणे शक्य होणार असल्याचे अग्निशमन दलाने लोकार्पण सोहळ्यात स्पष्ट केले होते. मात्र, सोमवारी लागलेल्या आगीत रोबोकडून अपेक्षित असे काम न झाल्यामुळे हा रोबो फेल गेल्याचं बोललं जात आहे. मात्र, त्याला टेस्टिंगसाठीच आणलं होतं अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -