Mucormycosis: मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

Mucormycosis: मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

Mucormycosis: मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेचा कहर थांबत नाही तोवर तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहे. सध्या राज्यात म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) प्रमाण वाढता दिसत आहे. काल सोमवारी अमरावतीत म्युकरमायकोसिसचा पहिल्या बळीची नोंद झाली. आज मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी नोंदवला गेला आहे.

मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये (K.E.M. Hospital) ३६ वर्षीय रुग्णाचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईतील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या १५०वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत महापालिकेच्या केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय, नायर रुग्णालय आणि कुपर रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन आणि औषधांसाठी महापालिकेने विशेष व्यवस्था स्थापन केली आहे, जेणेकरून महापालिकेच्या रुग्णालयात याचा तुटवडा भासून नये.

म्युकरमायकोसिसची लक्षणे

म्युकरमायकोसिसपासून वाचण्यासाठी काय कराल?


हेही वाचा – Corona Update: देशात २४ तासांत कोरोना मृत्यूच्या संख्येत उच्चांकी वाढ; आतापर्यंत २,७८,७१९ जणांचा मृत्यू


 

First Published on: May 18, 2021 11:44 AM
Exit mobile version