घरCORONA UPDATECorona Update: देशात २४ तासांत कोरोना मृत्यूच्या संख्येत उच्चांकी वाढ; आतापर्यंत २,७८,७१९...

Corona Update: देशात २४ तासांत कोरोना मृत्यूच्या संख्येत उच्चांकी वाढ; आतापर्यंत २,७८,७१९ जणांचा मृत्यू

Subscribe

देशात एकाबाजूला दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे आणि कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला चिंतेची बाब म्हणजे कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही आहे. आज देशात २४ तासांत कोरोना मृत्यूच्या संख्येत उच्चांकी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले माहितीनुसार, देशात २४ तासांत २ लाख ६३ हजार ५३३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४ हजार ३२९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४ लाख २२ हजार ४३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ५२ लाख २८ हजार ९९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ७८ हजार ७१९ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी १५ लाख ९६ हजार ५१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३३ लाख ५३ हजार ७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९ जणांचे लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, १७ मेपर्यंत देशात ३१ कोटी ८२ लाख ९२ हजार ८८१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी काल दिवसभरात १८ लाख ६९ हजार २३३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात काल दिवसभरात २६ हजार ६१६ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच ५१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५२ लाख ५ हजार ६८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८२ हजार ४८६ जणांचा मृत्यू झाला असून ४८ लाख ७४ हजार ५८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Home Isolation Guildelines: सौम्य लक्षणांच्या रुग्णांना आता होम आयसोलेशनचा पर्याय, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -