कस्टडीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पाच पोलीस निलंबित

कस्टडीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पाच पोलीस निलंबित

वडाळा ट्रक पोलीस ठाण्यात कस्टडीत एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विजय सिंग असे त्याचे नाव होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलीस कस्टडीत मारहाणीत विजयचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यामुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला. या प्रकरणाची दखल घेत पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

एॅड. अरविंद तिवारी यांनी दाखल केली याचिका

या घटनेनंतर महाराष्ट्र हा देशात कस्टडीत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुमोटो दाखल करा. तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका एॅड. अरविंद तिवारी यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टी कालीन न्यायालयात न्यायमूर्ती तातडे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करत जस्टीस तातडे यांनी मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठासमोर पाठवली आहे. ४ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

First Published on: November 1, 2019 6:33 PM
Exit mobile version