मुंबईत आता प्रत्येक इमारतीवर लागणार सीसीटीव्ही – अनिल देशमुख

मुंबईत आता प्रत्येक इमारतीवर लागणार सीसीटीव्ही – अनिल देशमुख

अनिल देशमुख, गृहमंत्री

विनयभंग, बलात्कार, अत्याचार आणि महिलांवरली हल्ले अशा घडणार्‍या घटना रोखण्यासाठी आता मुंबईत सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. आता मुंबईत तब्बल पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक इमारतीवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत, असे देखील ते पुढे म्हणाले.

मुंबईत आता सीसीटीव्हीची करडी नजर

‘मुंबईत जेवढ्या इमारती आहेत. त्या इमारतींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्यानुसार बांधकामाबाबत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा नियमात बदल देखील करणार आहोत. कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा विचार करत आहोत’, असल्याची माहिती देशमुखांनी दिली आहे.

या घटनांनमुळे महिलेंची सुरक्षा ऐरणीवर

वर्धा येथील हिंगणघाट येथील चौकात महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका ५० वर्षीय महिलेला गावातील बीअर बार चालकाने रात्री घरात घुसून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. या दोन्ही घटना घडल्याने महाराष्ट्र हादरला असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना नवी मुंबईत घडली आहे. तर मुंबई माटुंगा रोड रेल्वे पुलावरती एका आरोपीने मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षितेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता मुंबईत लागणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे अशा घटना रोखण्यसाठी मदत होईल.


हेही वाचा – शिवाजीपार्क मैदानाचा लवकरच कायापालट


 

First Published on: February 7, 2020 4:27 PM
Exit mobile version