केईएम रुग्णालयात ४३ व्हेंटिलेटर नादुरुस्त

केईएम रुग्णालयात ४३ व्हेंटिलेटर नादुरुस्त

केईएम रुग्णालय

मुंबईत कोरोना काहीसा नियंत्रणात आलेला आहे. कोरोनाग्रस्त काही रुग्णांना कधी कधी व्हेंटिलेटरची तीव्र आवश्यकता भासते. नेमके त्याचवेळी व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे समोर येते. पालिकेच्या केईएम रुग्णालयात सध्या ३३९ व्हेंटिलेटर असून त्यापैकी २९६ व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत ; मात्र ४३ व्हेंटिलेटर हे नादुरुस्त अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

परळ येथील केईएम रुग्णालय हे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयापैकी एक रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण विविध आजारांवर उपचार करण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यामधून, मुंबई बाहेरील ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्हयामधून येत असतात.काही जणांना गंभीर आजार असल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यात येतात. मात्र कधी कधी या महत्वाच्या रुग्णालयातही अत्यावश्यक असलेल्या व्हेंटिलेटरची कमतरता भासते. त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होतो. सध्या केईएम रुग्णालयात ३३९ व्हेंटिलेटर असून त्यापैकी २९६ व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत तर उर्वरित ४३ व्हेंटिलेटर हे नादुरुस्त अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. रुग्णालयात गंभीर अवस्थेतील रुग्णांना व्हेंटिलेटरची व्यवस्था असणे आवश्यक बाब आहे. पालिका प्रशासन आरोग्य विभागासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते तर मग सर्वच व्हेंटिलेटर सुस्थितीत असणे गरजेचे आहे.


हेही वाचा – मुंबईकरांसाठी खुशखबर! राणी बागेचे दरवाजे १५ फेब्रुवारीपासून उघडणार


 

First Published on: February 12, 2021 10:31 PM
Exit mobile version