घाटकोपर गणेश म्हस्के हत्याप्रकरणी ४ जणांना अटक

घाटकोपर गणेश म्हस्के हत्याप्रकरणी ४ जणांना अटक

गणेश म्हस्के हत्या प्रकरण

घाटकोपर येथे रस्ता देण्याच्या वादातून गणेश म्हस्के या तरुणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आज चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये श्याम अहिरे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.

गाडीवरुन घेतला आरोपीचा शोध

गाडी बाजूला घेण्याच्या वादातून गणेश म्हस्के याची हत्या करण्यात आली होती. चार आरोपींनी गणेशला मारहाण केली त्यानंतर त्याला नाल्यामध्ये फेकून दिले होते. घाटकोपर पश्चिम येथीर साईनाथनगर भागामध्ये ही घटना घडली होती. या हत्येनंतर ४ ही आरोपी गाडी घटनास्थळी सोडून पळून गेले होते. या घटनेनंतर घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या गाडीवरुन त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान आरोपी हे त्याच परिसरामध्ये राहणारे असल्याची माहिती समोर आली. आधी पोलिसांनी दापोली येथे पळून गेलेल्या तीन जणांना अटक केली. त्यानंतर आता चौथ्या आरोपीला अटक केली. आज चौथ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

अशी घडली घटना

गणेश हा घाटकोपर येथील साईनाथ नगर येथे राहण्यास होता. बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास गणेश हा बाईकवर साईनाथ नगर येथील नाल्याजवळ मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्याचवेळी कारमधून आलेल्या ४ जणांनी त्याला बाईक बाजूला काढण्यास सांगितले. या वादातून या चौघांनी गणेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला उचलून नाल्याच्या भिंतीवर फेकून पळून गेले. गणेशचे डोकं नाल्याच्या भिंतीवर आदळल्याने तो नाल्यात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली.

गणेशचे आरोपीच्या भाचीवर एकतर्फी प्रेम

दरम्यान, या हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येचे कारण वेगळेच असून मृत गणेश हा निलंबित पोलीस अधिकार्‍याच्या भाचीवर एकतर्फी प्रेम करीत होता. तिला तो जाता-येता त्रास देत असल्यामुळे तिने याबाबत घरच्यांकडे तक्रार केली होती. अशी माहितीदेखील समोर येत आहे.

हेही वाचा – 

घाटकोपरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या

First Published on: June 21, 2019 5:22 PM
Exit mobile version