निर्बंधमुक्त वातावरणात बाप्पा निघाले मंडपाकडे; भक्तांमध्ये खरेदीचाही उत्साह

गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काहीच दिवस राहिले आहेत. अशातच खरेदीचा उत्साह सुद्धा गणेश भक्तांमध्ये मोठया प्रमाणावर दिसून येतो. खरतर सण – उत्सव म्हटले की संपूर्ण वातावरणच आनंददायी होतं. तब्बल दोन वर्षांनंतर गणेशोत्सवाचा हा उत्साह पुन्हा अनुभवता येणार आहे. निर्बंधमुक्त सण साजरे होत असल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या निर्बंधमुक्त आणि मोकळ्या वातावरणात गणपती बापा सुद्धा मंडपाकडे निघाले आहेत. तर मुंबईच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी दिसून आली.

1) दोन वर्षांच्या ब्रेक नंतर यावर्षी पुन्हा एकदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. सण – उत्सव साजरे करण्यासाठी असलेले सर्व निर्बंध सुद्धा हटविण्यात आले आहेत.

 

2) निर्बंधमुक्त वातावरणात गणपती बाप्पा सुद्धा मंडपात जायला निघाले आहेत.

 

3) गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचे भक्त मोठया संख्येने बाप्पाला मंडपात घेऊन जाण्यासाठी जमले आहेत.

 

4)  कोरोना नंतर दोन वर्षांनी बाप्पाचे भक्त हा अविस्मरणीय क्षण अनुभवत आहे.

 

5) गिरगावातही गणेशोत्सवाचा उत्साह दिसत आहे. यंदा गणेश मूर्तींच्या उंचीवरचे सुद्धा निर्बंध हटविण्यात आले आहेत. गिरगावातील सुतार गल्ली मधील बाप्पाची ही भव्य आणि आकर्षक मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

6) गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुद्धा सगळीकडे सुरु झाली आहे. मुंबईतल्या मार्केट मध्ये खरेदी साठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.

 

7)  दादर मार्केट सुद्धा गणपती बाप्पाच्या सजावटीच्या वस्तूंनी गजबजून गेले आहे.

First Published on: August 28, 2022 7:54 PM
Exit mobile version