महाराष्ट्रात ४९ गुन्हे दाखल असलेला गँगस्टर रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या तावडीत

महाराष्ट्रात ४९ गुन्हे दाखल असलेला गँगस्टर रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या तावडीत

गँगस्टर रवी पुजारी

मुंबई पोलिसांनी मंगळवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी कुख्यात गुंड रवी पुजारीला मुंबईत ताब्यात घेतले. जेलमध्ये अटक करण्यापूर्वी त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. पोलिस त्याला आज मकोका कोर्टात हजर करणार असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशानंतर रवी पुजारी अखेर मुंबई पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळविण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. रवी पुजारी याच्यावर मुंबईत साधारण ४९ गुन्हे दाखल असून अनेक बड्या आणि प्रसिद्ध व्यक्तींना त्याने खंडणीसाठी धमकावले आहे. त्याचा ताबा मिळाल्याने अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ च्या गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी पुजारीच्या ताब्यात घेण्याची मागणी केली होती. रवी पुजारीवर महाराष्ट्रात एकूण ४९ गुन्ह्यांची नोंद आहे, त्यातील २६ गुन्ह्यांची प्रकरणे मकोका अंतर्गत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून फरार असलेला गुंड रवी पुजारी याला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथून अटक करण्यात आली होती. रवी पुजारी याच्याविरूद्ध महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात खून, खूनाचे आरोप, पैशाची खंडणी यासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २००० मध्ये त्यांनी भरत नेपाळी, हेमंत पुजारी, विजय शेट्टी यांनादेखील त्याने आपल्या टोळीत समाविष्ट केले होते.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात पुजारीच्या मुलाचे लग्न झाले होते आणि त्याकडे ऑस्ट्रेलियन पासपोर्टही आहे. यापूर्वी २०१९ मध्ये अँथोनी नावाने वावरत असलेल्या पुजार्‍याने फसव्या पद्धतीने सेनेगल कोर्टाकडून जामीन मिळविला होता. असेही सांगितले जात आहे की, पुजारीचे छोटा राजनशी अगदी जवळचे संबंध होते. मात्र २००० मध्ये तो वेगला झाला होता.

कोण आहे रवी पुजारी?

रवी पुजारी हा मूळचा कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील मालपे येथील असून १९९० मध्ये त्याने गँगस्टर छोटा राजन टोळीसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वत:ची गुन्हेगारी टोळी बनवली. पुजारी याने मुंबई, बंगळुरू आणि मँगलोर येथे वेगवेगळया क्षेत्रातील व्यावसायिक, बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींना खंडणीसाठी धमकावण्यास व हस्तकांमार्फत त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपल्या टोळीची दहशत निर्माण केली. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट आणि अली मोरानी यांच्या हत्येचा कट रचल्याचाही पुजारीवर आरोप आहे.


कोरोना लसीकरणावर मोदी सरकारचा नवा प्लान तयार

First Published on: February 23, 2021 10:49 AM
Exit mobile version