Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात घसरण अन् चांदी महागली : जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today :  सोन्याच्या दरात घसरण अन् चांदी महागली : जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात घसरण अन् चांदी महागली : जाणून घ्या आजचे दर

आजही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत ०.२२ टक्क्यांनी घसरण झाली आहे.तसेच, चांदी महागली आहे. आज बुधवारी चांदी ही ०.०४ टक्क्यांनी महागली असून ६२ हजार  ३१३ रुपये इतकी किंमत झाली आहे. आज देशाची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१ हजार २६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. याशिवाय कोलकाता येथे ४९ हजार ९९० रुपये, मुंबईत ४८ हजार ११० रुपये आणि चेन्नईमध्ये ४८ हजार ९६०  रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

 

३ डिसेंबरपर्यंत तुम्ही स्वस्त सोने खरेदी करू शकता

यावेळी केंद्र सरकार सर्वांना स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. ३ डिसेंबरपर्यंत तुम्ही स्वस्त सोने खरेदी करू शकता. आरबीआयच्या म्हणण्यानुसार ,बाँडची इश्यू किंमत ४ हजार ७९१ रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय डिजीटल पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांच्या सवलतीचा लाभ मिळेल. अशा गुंतवणूकदारांसाठी, गोल्ड बॉण्डची इश्यू किंमत ४ हजार ७४१ रुपये प्रति ग्रॅम सोन्यासाठी असेल.

तुम्हीही सोन्याचे दर तपासू शकता…

तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला सोन्याच्या दराचा मेसेज येईल.

 


 हे ही वाचा – रोजगार पळवण्यासाठी आणि हिंसाचार घडवण्यासाठी गुप्त बैठका; ममतादीदींच्या दौऱ्यावर शेलारांचा आरोप


 

First Published on: December 1, 2021 2:10 PM
Exit mobile version