जीएसबीचा बाप्पा घालणार २० कोटींचे दागिने

जीएसबीचा बाप्पा घालणार २० कोटींचे दागिने

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकरांसह देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. सर्वच भाविकांना बाप्पाच्या स्वागताची उत्सुकता लागली आहे. घरगुती गणेशोत्सव असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सवात सुरू असणाऱ्या तय्यारीमुळे सर्वत्र मंगलमय वातावरण तयार झाले आहे. बाप्पाचे आगमन केवळ एक ते दोन दिवसावर येऊन ठेपले आहे. मंदीची पार्श्वभूमी असली तरी यावेळी भाविकांमध्ये बाप्पाच्या तयारीमध्ये कुठेही काटकसर दिसत नाही.


हेही वाचा-  मुंबईतील गणेशोत्सवाचा कोटींचा विमा

मुंबईच्या हायप्रोफाईल मानला जाणाऱ्या गणेश मंडळ किग्ज सर्कलचा जीएसबी सेवा मंडळात यंदा २० कोटी रूपयांहून अधिक किंमतीचे दागिने हा बाप्पा घालून विराजमन होणार आहे. यामध्ये सोने, चांदीच्या दागिन्यांचा समावेश असणार आहे.

१०० सीसीटिव्ही कॅमेऱ्याची नजर

२० कोटी रूपयांहून अधिक किंमतीचे दागिने हा बाप्पाला घातलेले असल्याने त्याच्या सुरक्षेसाठी १०० सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. यासोबतच ४,५०० सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात येणार आहे. यावेळी जीएसबी सेवा मंडळाने २६६.५० कोटी रूपय़ांचा विमा देखील काढला आहे, असे जीएसबीच्या पदाधिकारी सतीश नायक यांनी सांगितले. विशेष म्हणजे मुंबईचा जीएसबी गणेश मंडळ हे हायप्रोफाईल आणि श्रीमंत गणेश मंडळाच्या नावाने प्रसिद्ध आहे. या बाप्पाच्या दर्शनाकरिता पाच दिवस नेते-अभिनेत्याची उपस्थिती असते.

सुरक्षेच्या दृष्टीने २६६.५० कोटी रूपय़ांचा विमा

१४ फूट असणाऱ्या बाप्पांच्या मुर्तीला १०० किलोहून अधिक सोने आणि चांदीच्या दागिन्यांनी मढवले जाते. दरवर्षीपेक्षा यंदा बाप्पाला अधिक दागिने बनविण्यात आले आहे. ज्यांची किंमत २० कोटींपेक्षा अधिक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता यंदा मंडळाने २६६.५० कोटी रूपय़ांचा विमा काढला आहे.

या मंडळात बाप्पाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून अनेक भाविक दर्शनाकरिता येत असतात. या ठिकाणी होणारी पूजा आणि तुलादान प्रसिद्ध आहे. बाप्पाच्य़ा दर्शनासाठी येणारे भाविक कोटींच्या कोटी रूपये बाप्पाच्या दानपेटीमध्ये टाकतात. पाच दिवस येणारे दान हे पैशाच्या स्वरूपात तसेच सोने, चांदी स्वरूपात देखील असते.

First Published on: August 30, 2019 8:36 AM
Exit mobile version