पावसात यंदा मुंबई तुंबणार नाही; पालकमंत्री आदित्य ठाकरे

पावसात यंदा मुंबई तुंबणार नाही; पालकमंत्री आदित्य ठाकरे

‘मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना वारंवार होतात. दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाली की, अनेक सखल भागात पाणी साचते. मुंबईसारख्या शहरात पाऊस पडायला लागला की, नागरिकांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. मात्र, यंदा अशी परिस्थिती उद्भवणार नाही. कारण मुंबईतलं पाणी साचणं कसं कमी होईल’, यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही’, असे आश्वासन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहे.

सत्तेत असताना ५ वर्षे काय केले

‘महाराष्ट्र राज्यात भाजप गेले पाच वर्षे होते. त्या पाच वर्षात भाजपने काय केले. तसेच भाजपला औरंगाबादच्या नामांतराबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही’, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. टीका करणं हे विरोधकांचं कामच  आहे. मी औरंगाबादला जाणार आहे आणि तेथील विकासकामांचा आढावा घेणार आहे. त्यामुळे भाजपला नामकरणावर बोलण्याचा कोणताही आधिकार नाही. पाच वर्षे सत्तेत असताना त्यांनी काही केले नाही. मात्र, आमचे काम जनतेसाठी करणे आहे आणि आम्ही ते करत आहोत. त्यामुळे भाजपने याबाबत काहीही बोलू नये’, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

या विषयांवर झाली चर्चा

मुंबई महापालिकेत झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत मुंबई हा महत्त्वाचा विषय होता. यापार्श्वभूमीवर पाणी तुंबणे, रस्त्यावरील वाहतूक, रस्त्यावरील लाईट्स, प्लेग्राऊंड, वाहतूक हाताळणी, कचरा व्यवस्थापन यावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – नायलॉन मांजाने कापली युवकाची मान


First Published on: January 7, 2021 3:14 PM
Exit mobile version