मालगाडीचा डबा घसरल्याने मध्यरात्री हार्बर विस्कळीत

मालगाडीचा डबा घसरल्याने मध्यरात्री हार्बर विस्कळीत

मध्य रेल्वेवर कुर्ला येथे मालगाडीचा गाडी घसरल्यामुळे मंगळवारी रात्री हार्बर रेल्वे ठप्प पडली होती. परिणामी, वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक कोलमडली. या घटनेमुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना ऐन परतीच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.२७ वाजता मालगाडीचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ती रात्री उशीरपर्यंत ठप्प असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

व्हिडिओसाठी क्लिक करा:

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2681913338565537&id=1678248008932080

First Published on: January 15, 2020 1:42 AM
Exit mobile version