अवेळी पावसाने मुंबईकरांची तारांबळ

अवेळी पावसाने मुंबईकरांची तारांबळ

राज्यात परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. क्यार, महा या वादळांमुळे राज्यात पावसाचे वातावरण आहे. काल रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरात जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा बरसल्या. आज सकाळीसुद्धा मुंबई, मुंबई पूर्व उपनगर, मुंबई पश्चिम उपनगरमध्ये अवेळी आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

महा चक्रीवादळाचा परिणाम

दरम्यान अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली होती. वादळाची तीव्रता वाढल्याने पालघर, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, या वादळाचा मुंबईच्या किनारपट्टीला धोका नसल्याची माहिती देण्यात आली होती.

First Published on: November 8, 2019 7:52 AM
Exit mobile version