Pornography case: पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला HC चा दिलासा

Pornography case: पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला HC चा दिलासा

Pornography case: पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला HC चा दिलासा

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात काल बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन (Sherlyn Chopra ) चोप्रा हीला गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले होते. सुनावणीसाठी तिला आज न्यायालयात हजर राहण्याच आदेश देण्यात आले होते. मात्र आता पॉर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra ) आणि पूनम पांडे (Poonam Pandey)यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून २० सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आलेत. (High Court consolation to actresses Sherlyn Chopra and Poonam Pandey in pornography case)  पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होईल या भितीने दोन्ही अभिनेत्रींनी आधीच अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती मात्र हायकोर्टाकडून दोघींना दिलासा मिळालाय.

पॉर्नोग्राफी प्रकरणात पहिल्यांदा पूनम पांडे हीने याआधीही हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्याप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा देखील मिळाला होता. मात्र मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणात अनेक बड्या कारवाई करण्यात सुरुवात केल्याने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचे पोर्नोग्राफी कनेक्शन असल्याचे समोर येत आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्राने एका परदेश कंपनीसोबत अडल्ड कन्टेंट तयार करण्यासाठी करार केला होता. तो कंन्टेंट पायरसीच्या माध्यामातून लीक झाला आणि शर्निल चोप्राच्या विरोधात आयटी कलमाविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शर्लिन चोप्रा वेळोवेळी पोलिसांच्या चौकशीसाठी हजर राहिली होती त्यामुळे तिला अटकपूर्व जामीन देण्यात आलेला नसला तरी तिला अटकेपासून हायकोर्टाने दिलासा दिला आहे. अभिनेत्री पूनम पांडेच्या विरोधात देखील अशाप्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. दोघींच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी हायकोर्टाने २० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

शर्लिनने व्हिडिओ शेअर करत मांडली बाजू

शर्लिन चोप्रा हीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत राज कुंद्रा आणि पॉर्नोग्राफी व्हिडिओवर आपले मत मांडले. महाराष्ट्र सायबर सेलकडे या विषयावर जबाब नोंदवणारी मी पहिली महिला असेन. जेव्हा मला समन्स बजावण्यात आले तेव्हा मी त्यांच्यासारखी गायब झाली नाही. मी शहर किंवा देश सोडून गेली नाही. मार्च २०२१मध्ये मी महाराष्ट्र सायबर सेलसमोर माझा नि:पक्षपाती जबाब नोंदवला. मी पत्रकार आणि मीडिया रिपोर्टना विनंती करते की, महाराष्ट्र सायबर सेलशी संपर्क साधा आणि आपले प्रश्न त्यांच्यासमोर ठेवा आणि शक्य असल्यास माझ्या जबाबातील काही माहिती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करा, असे शर्लिनने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा – शर्लिन चोप्राला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये राज कुंद्राने दिलं होतं काम? एका व्हिडीओमागे मिळायचे लाखो रुपये

First Published on: July 27, 2021 11:47 AM
Exit mobile version