घरच्या घरी बनवा शुद्ध देशी तूप

घरच्या घरी बनवा शुद्ध देशी तूप

तूप हे शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे. यामुळे रोजच्या आहारात तूपाचा आवर्जून समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत असतात. यामुळे बरेचजण घरच्या घऱी तूप तयार करतात. तर काहीजणांना विशेष करून जर तुम्ही जॉब करणाऱ्या महिला असाल तर वेळ नसल्याने अनेकजणी बाजारात मिळणारे तयार तूप वापरतात.

पण बाजारात मिळणाऱ्या तूपात बऱ्याचवेळा भेसळ असल्याचे समोर आले आहे. यामुळे तब्येत सुधारण्यापेक्षा ती हे भेसळयुक्त तूप खाऊन बिघडण्याचीच अधिक शक्यता असते. यामुळे घरातच दूधावरील सायीपासून शूद्ध तूप बनवणे योग्य.

त्यासाठी घऱातील दूधावरील साय रोज एका बाऊलमध्ये जमवावी. नंतर या सायीचे लोणी होईपर्यंत ती फेटत राहावी.

वरती आलेले लोणी एका बरणीत काढून फ्रीजमध्ये ठेवावे.

एक ते दोन तासानंतर गरम कढईत हे थंड लोणी टाकावे.

लोणी वितळत असताना ते सारखे ढवळत राहावे

काही वेळानंतर तूप वर येऊ लागेल आणि लोण्याचा कण कढईच्या तळाशी जमा होतील.

तूपात लवंग आणि वेलची टाकल्यास त्याला चव चांगली येते आणि तूपाचा रंगही सुंदर होतो.

या प्रक्रियेत तूप करपणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर एका बरणीत तूप गाळून भरावे

 

 

First Published on: October 11, 2022 7:10 PM
Exit mobile version