थंडीत दमा- अस्थमा बळावतो

थंडीत दमा- अस्थमा बळावतो

Monsoon & Asthma: पावसाळ्यात दम्याच्या रुग्णांनी राहा सावध, अशी घ्या स्वत:ची काळजी

थंडीचा गारवा, दमटपणा आणि प्रदूषण म्हणजेच धूर-धूरके या सर्वांचा त्रास हिवाळ्यात होतो. यातून काहींना थंडी, खोकल्याचा ही आजार जाणवतो. पण, याच काळात श्वसनविकारांचा त्रास ही मोठ्या प्रमाण वाढतो. त्यामुळे अशा आजारांवर घरगुती उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. हवेतील धुलिकणांमुळे शरीरातून कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर टाकता येत नाही. त्यामुळे कधी- कधी श्वसन नलिकेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क लावूनच घराबाहेर पडा असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

तर, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांनाही वातावरणाचा त्रास जाणवतो. थंडी सुरू झाल्यामुळे खोकला तसेच घसादुखी या आजारांकडे सहज दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे प्रतिजैविकांचा वापर होतो. घरगुती औषधे न करता डॉक्टरांकडे जायला हवे, असा सल्ला डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिला आहे.

६० ते ७० टक्के रुग्णांमध्ये दम्याची लक्षण

या दिवसात वातावरण अधिक धूर-धूरके असतात. त्यामुळे दमा, श्वसनविकारांमध्ये वाढ होते आहे. ३० पैकी २० रुग्णांना तरी दमा आणि अस्थमाची लक्षण सध्या दिसून येत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर ६० ते ७० टक्के एवढ्या रुग्णांमध्ये सध्या दम्याची लक्षण आढळत आहेत. हे प्रमाण वाढतं असल्यामुळे बाहेर निघताना किमान तोंडावर स्कार्फ बांधावा. ज्यामुळे नाकावाटे धूलिकण शरीरात प्रवेश करु शकणार नाहीत. ज्यांना अस्थमा आणि सीओपीडीचा आजार असेल त्यांनी अशा वातावरणात काळजी घेणं गरजेचं आहे. श्वसननलिकेला सूज येऊन ती आकुंचन पावू शकते. त्यातून श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. श्वास कोंडाणे ही लक्षण दिसून येतात. सर्दी होऊन कफ होतो. धूम्रपान करणाऱ्यांना या दिवसात फार त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषणाच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. त्यासोबतच धूम्रपान करणं ही टाळलं पाहिजे.  – डॉ. राजेंद्र ननावरे, छाती आणि फुप्फुस विकार तज्ज्ञ


वाचा – अस्थमावर मासे उपायकारक

वाचा – हिवाळ्यात घ्या तुमच्या फुप्फुसांची काळजी


 

First Published on: December 25, 2018 6:00 AM
Exit mobile version