जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीय, सचिन वाझेंचे धक्कादायक WhatsApp स्टेटस

जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीय, सचिन वाझेंचे धक्कादायक  WhatsApp स्टेटस

वेळ आलीय जगाचा निरोप घेण्याची, वाझेंचे धक्कादायक व्हॉट्सअॅप स्टेटस वेळ आलीय जगाचा निरोप घेण्याची, वाझेंचे धक्कादायक व्हॉट्सअॅप स्टेटस

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची गेल्या 24 तासांत दुसर्‍यांदा बदली झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांची गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागातून (सीआययू) नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली. यानंतर वाझे तणावात असल्याचे त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवरुन समोर येत आहे. वेळ आलीय जगाचा निरोप घेण्याची असे धक्कादायक स्टेट्स वाझेंना ठेवले आहे. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

24 तासांत सचिन वाझे यांची दुसर्‍यांदा बदली

3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली. ती केस अजूनही न्यायप्रविष्ठ आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असे धक्कादायक स्टेटस सचिन वाझेंनी आपल्याला व्हॉट्सअॅपला ठेवले आहे.

वेळ आलीय जगाचा निरोप घेण्याची, वाझेंचे धक्कादायक व्हॉट्सअॅप स्टेटस

सचिन वाझेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तपास एनआयएकडे सोपवा

गेल्या महिन्यात जिलेटीनच्या कांड्या असलेली एक स्कॉपिओ कार मुकेश अंबानी यांच्या बंगल्यावर संशयास्पदरित्या सापडली होती. या घटनेनंतर कारचा मालक असलेल्या मनसुख हिरेन यांची पोलिसांकडून चौकशी झाली होती. ही चौकशी सुरू असतानाच हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. हिरेनच्या पत्नीने तिच्या पतीची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. त्यावरुन विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड गदारोळ उडाला होता. विरोधकांनी सचिन वाझे यांना निलंबित करून त्यांच्या अटकेची जोरदार मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेकडून बदली करण्यात आल्याची घोषणा केली. तसा आदेशच नंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना देण्यात आला होता.

वाझे-हिरेन यांचा सीडीआर रिपोर्ट बाहेर आलाच कसा?


हेही वाचा- सचिन वाझे डान्सबार, लेडीजबारवरही धाडी टाकण्यात होते आघाडीवर


 

First Published on: March 13, 2021 11:42 AM
Exit mobile version