भांडुपमध्ये २० बेड्सचा नवजात शिशु अतिदक्षता विभाग; महापौरांच्या हस्ते लोकार्पण

भांडुपमध्ये २० बेड्सचा नवजात शिशु अतिदक्षता विभाग; महापौरांच्या हस्ते लोकार्पण

भांडुपमध्ये २० बेड्सचा नवजात शिशु अतिदक्षता विभाग; महापौरांच्या हस्ते लोकार्पण

भांडुपमधील नवजात शिशुची प्रकृती बिघडल्यास उपचारासाठी थेट पालिकेच्या केईएम अथवा नायर रुग्णालयात रात्रीअपरात्री न्यावे लागायचे. त्यामुळे पालकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागायचे. मात्र, आता भांडुप (प.), येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहात उभारण्यात आलेल्या २० बेड्सच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागामुळे भांडुपकरांची चिंता कायमची मिटली आहे. त्यामुळे नवजात शिशुला गंभीर आजारातही तात्काळ उपचार मिळण्यास मोठी मदत मिळणार आहे. या नव्याने उभारलेल्या २० बेडच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बुधवारी पार पडले.

लोकार्पणाच्या वेळी आमदार रमेश कोरगावकर, माजी खासदार संजय दिना पाटील, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर, ‘एस आणि टी’ विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा दिपमाला बढे, नगरसेविका सुवर्णा करंजे, आशा कोपरकर, जागृती पाटील, दिपाली गोसावी, साक्षी दळवी, नगरसेवक उमेश माने, कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे, ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी आदी मान्यवर उपस्थित होते.

पूर्व उपनगरामध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्याची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आज पूर्ण झाली आहे, असे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केले. कोरोनाचे स्वरूप बदलत असल्यामुळे सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. यापुढे आता लसवंत व्हा, असे महापौरांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांनी, सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आल्यामुळे बऱ्याच वर्षापासूनची मागणी या कामामुळे पूर्ण झाली असल्याचे सांगितले. तसेच सद्यस्थितीत डायलिसिस रुग्णांची संख्या वाढत असल्याने या ठिकाणी महापालिकेने दोनशे-तीनशे बेडचे डायलिसिस सेंटर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


हेही वाचा – मुंबईत लसीअभावी १९ आणि २० ऑगस्ट रोजी लसीकरण बंद


 

First Published on: August 18, 2021 11:10 PM
Exit mobile version