मुंबईत लसीअभावी १९ आणि २० ऑगस्ट रोजी लसीकरण बंद

दुसरा डोस घेऊन रेल्वे पास काढण्याच्या तयारीत असलेले मुंबईकर मात्र बेचैन झाले आहेत. त्यांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आणखीन दोन दिवस वाट बघावी लागणार आहे.

no shortage of corona vaccine in india now 10 croce vaccines stock available of all states
लसीकरणाची चिंता मिटली, राज्यांकडे १० कोटी लसींचा साठा शिल्लक

सध्या मुंबईत लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेने १९ व २० ऑगस्ट रोजी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेऊन रेल्वे पास काढण्याच्या तयारीत असलेले मुंबईकर मात्र बेचैन झाले आहेत. त्यांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आणखीन दोन दिवस वाट बघावी लागणार आहे. (Vaccination closed on 19th and 20th August in Mumbai due to lack of vaccine)

मुंबईत एकीकडे कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपविण्यात मुंबई महापालिकेला यश आलेले असताना दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवास करण्याची ( मासिक पास) परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी शहर व उपनगरे येथील पालिका, शासकीय व खासगी लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. लस लवकर मिळावी व आपले दोन डोस पूर्ण करून रेल्वे प्रवास करणे सुलभ व्हावे यासाठी सामान्य नागरिक आतूर झाला आहे.

तर दुसरीकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी कोविडच्या तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली आहे. मात्र सध्या मुंबईत लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेने १९ व २० ऑगस्ट रोजी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
परिणामी, मुंबईकरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. मुंबई महापालिकेला लसीचा योग्य पुरवठा होत नसल्याने पालिका प्रशासनाचाही नाईलाज झाला असल्याने दोन दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र १९ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाला लसीचा आवश्यक साठा प्राप्त होणार आहे. परंतु २० ऑगस्ट रोजी दिवसभरात लस केंद्रांना त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे २१ ऑगस्ट रोजी लसीकरण पुन्हा सुरु होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २ वर, दीड वर्षात सर्वात कमी मृत्यू दर