मतदानाचा टक्का वाढावण्यासाठी भिवंडीत अनोखी शक्कल

मतदानाचा टक्का वाढावण्यासाठी भिवंडीत अनोखी शक्कल

मतदान

मतदानात समाजातील सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी शासनपातळीवर अनेक उपक्रम राबविले जातत. त्याचाच एक भाग म्हणून भिवंडी शहरात ज्येष्ठ नागरिकांसह युवकांमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती उपक्रमाअंतर्गत आदर्श पार्क येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात सदरचा महाकार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले सहाय्यक आयुक्त दिलीप खाने यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये मतदार जनजागृती करण्यात आली.

यावेळी २३ भिवंडी लोकसभा अंतर्गत ज्येष्ठ नागरिक,अपंग,दिव्यांग यांच्याकरिता मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या सोईसुविधा ,त्यांच्यासाठी घरापासून मतदान केंद्रापर्यंत प्रवास करता यावा यासाठी मोफत रिक्षा व्यवस्था, ज्येष्ठ नागरीकांकरीतां मतदान केंद्रात ताटकळत न ठेवता थेट प्रवेश, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, मंडप व्यवस्था, पाळणाघर इत्यादी उपक्रमांची माहिती दिली. सहाय्यक आयुक्त दिलीप खाने यांनी आपण प्रत्येकाने कुटुंबियांना, मित्रपरिवारास मतदान हे श्रेष्ठ दान आहे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे असे आवाहन केले. ‘मी मतदान करणारच’ अशी प्रतिज्ञा ही वेळी घेण्यात आली.

सध्या तरूणांमध्ये सोशल मिडीयाची वाढती क्रेझ दिसून येते. युवक मोठ्या प्रमाणावर सोशल नेटवर्किंग साईट हाताळत आहेत.तोच धागा पकडून भिवंडी (प) १३६ लोकसभा मतदार संघात सोशल मिडीयाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. तरुण मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी ही शक्कल लढविण्यात आली आहे. स्वीप कक्षाच्यावतीने हा उपक्रम राबवला जात आहे. निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी SVEEP कक्षाची स्थापना केली असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सदानंद जाधव यांच्या संकल्पनेतून येथे युवकांना आकर्षीत करण्यासाठी अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यानुसार फेसबुक,ट्विटर या माध्यमांवर bhivandi parlimentary constituency अशा नावाने पेज account ग्रुप बनविण्यात आला आहे. त्यामध्ये रोजचे मतदार संघात होणारे उपक्रम यांची माहिती पोस्ट करण्यात येत असून सुमारे ५०० च्यावर पेज व्हुव या पेजला आजपर्यंत मिळाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  सदानंद जाधव यांनी देऊन देशाचे भवितव्य तरुणांच्या हाती अवलंबुन आहे.त्यामुळे जास्तीत-जास्त संख्येने तरुणांना लोकशाहीच्या या उत्सवात सामिल करून घेणे गरजेचे आहे.सोशल मीडिया हे तरुणाईपर्यंत पोहचण्याचा उत्तम पर्याय आहे.त्यामुळे फ़ेसबुक ट्विटर या माध्यमातून मतदार जागृतीवर भर देण्यात आला आहे.त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळत असल्याचे सदानंद जाधव यांनी सांगितले.

First Published on: April 24, 2019 6:53 PM
Exit mobile version