राणीच्या बागेत पांढरा सिंह, चिंपांझी, फ्लेमिंगो,जग्वॉर येणार

राणीच्या बागेत पांढरा सिंह, चिंपांझी, फ्लेमिंगो,जग्वॉर येणार

Raani Baug: राणीच्या बागेत पांढरा सिंह, चिंपांझी, फ्लेमिंगो, जग्वार येणार

मुंबईतील भायखळा येथील राणी बाग व प्राणी संग्रहालयाला आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त होत आहे. या राणी बागेत विदेशी प्राणी, पक्षी आणले जात आहेत. पेंग्विनला मुंबईकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आता आफ्रिकन पांढरा सिंह, चिंपाजी, जग्वॉर, चित्ता, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाची आकर्षण वाढणार. मुंबईत येणार आफ्रिकन पांढरे सिंह, चिंपाझी, चित्ता, लेसर फ्लेमिंगो, ब्लक जग्वार, मंद्रील मंकी हे प्राणी,पक्षीही लवकरच राणीच्या बागेत आणण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी अगोदर या प्राण्यांची निवासस्थान बांधण्यासाठी पालिकेने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. प्राणी-पक्षी प्रदर्शन गॅलरीचे आरेखन, संकल्पना आणि अभियांत्रिकी-बांधकामासाठी टेंडर मागवले आहे. याबाबतची माहिती राणी बाग व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. (In the Raani Baug will come white lions, chimpanzees, flamingos, jaguars)

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेमधून राणी बागेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान व प्राणिसंग्रहालय बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पालिकेतर्फे करण्यात येत आहेत. मात्र प्राणी मित्रांचे आक्षेप, काही प्रमाणात प्रशासकीय दिरंगाई आदी कारणास्तव त्यास थोडासा विलंब झालेला आहे.

मात्र गेल्या काही कालावधीत या राणी बागेत आतापर्यंत वाघ, बिबट्या, कोल्हा, हत्ती, अस्वल, तरस आदी प्राण्यांसह पेंग्विनला आणण्यात आले आहे. लवकरच या प्राण्यांसाठी रुग्णालय, ऑपरेशन थिएटर, नवे रस्ते, आकर्षक फुटपाथ, कृत्रीम जलाशय, प्रदर्शन गॅलरी बांधण्यात येणार आहे. आता नव्याने आणण्यात येणाऱ्या प्राण्यांसाठी निवासाची व्यवस्था करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली असून त्यासाठी ९० कोटी रुपयांपर्यंत खर्च येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – पालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून लस पुरवठादाराची माघार, ७ कंपन्यांची कागदपत्रेच नाहीत

First Published on: May 28, 2021 8:17 PM
Exit mobile version