जेजेत ही ‘विलगीकरण कक्ष’; दिवसाला १५० चाचण्या करणे शक्य!

जेजेत ही ‘विलगीकरण कक्ष’; दिवसाला १५० चाचण्या करणे शक्य!

जे. जे. रुग्णालय

कस्तुरबानंतर जेजे या सरकारी हॉस्पिटलमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. शिवाय, हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांच्या चाचण्या ही केल्या जाणार आहेत. दिवसाला १५० चाचण्या करणं शक्य होणार असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जे.जे. हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आलेल्या केंद्राची पाहणी केली. त्यावेळेस जेजेतील करोनाच्या चाचणी आणि उपचारासाठी तयारी पूर्ण झाल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय, सामाजिक दुरी सर्वांनी पाळावी, असं आवाहनही त्यांनी केले आहे. करोनाविरोधातील लढाईसाठी राज्य शासन सज्ज असून करोनाच्या तपासणी किंवा उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असे ही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

‘करोनाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सज्ज असून त्यांना आवश्यक सर्व मदत शासन देईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह संपूर्ण शासनव्यवस्था खंबीर आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे’.

दिवसाला १५० चाचण्या करणे शक्य

करोना अर्थात कोवीड-१९ या विषाणूचे चाचणी केंद्र खूप वेळेत उभे करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे. त्याची दिवसाला १५० चाचण्या घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता १ हजार पर्यंत वाढवता येते. या चाचणी केंद्रासोबतच करोनाबाधितांसाठी ७० खाटांचे विलगीकरण कक्ष आणि १० खाटांचे अतिदक्षता केंद्र सुरू करण्यात आले आहे.


हेही वाचा – कस्तुरबा, केईएम पाठोपाठ बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग


 

First Published on: March 23, 2020 10:33 PM
Exit mobile version