जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

स्वातंत्र दिन अवघ्या काही दिवसांवर असताना जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या हल्लाचा कट रचला जात आहे. यामुळे काश्मीरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु आहे. अशात काल जम्मू काश्मारीच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात भारतीय लष्कराच्या तीन जवावांना वीरमरण आले, तर दोन दहशतवादी ठार करण्यात यश आलं आहे.

राजौरीपासून 25 किती अंतरावरील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला. या आत्मघाती हल्ल्याच्या कटात दोन दहशतवादी सामील झाले होते. अशी माहिती भारतीय सुरक्षा दलाने दिली आहे. अद्यापही दहशतवाद्यांविरोधात लष्कराची कारवाई सुरू आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राजौरीच्या दरहाल भागात काल रात्री उशिरा दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या एका कँपवर हल्ला केला. त्यावेळी दहशतवाद्यांकडून लष्करावर जोरदार गोळीबार करण्यात आला दोन्ही बाजूंनी बराच गोळीबार सुरु होता. अखेर भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, यात तीन भारतीय जवान शहीद झाले.

11 राष्ट्रीय रायफल बटालियनकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजौरीच्या दरहाल भागात काल रात्री उशिरा दहशतवाद्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंनी जबरदस्त फायरिंग झाली, सहा किमीच्या परिसरात लष्कराने वेढून सर्च ऑपरेशन जारी केले. यावेळी दहशतवाद्यांकडून भारतीय लष्कराच्या कँपमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सध्या आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

यापूर्वी जम्मू- काश्मीरच्या उरीमध्ये 2016 मध्ये पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला केला होता. यामध्ये 19 जवान शहीद झाले. तर 19- 30 जवान जखमी झाले, यात चारही दहशतवादी मारले गेले. याला भारताने सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट केले.


जालन्यातील बडे स्टील व्यावसायिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर ; 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

First Published on: August 11, 2022 10:29 AM
Exit mobile version