जेट एअरवेज कंपनीचे विमान आज शेवटचे उड्डाण घेणार

जेट एअरवेज कंपनीचे विमान आज शेवटचे उड्डाण घेणार

jet airways : कर्मचाऱ्यांची ८५ लाख पर्यंत रक्कम थकीत परंतु २३ हजार रुपये देण्याची योजना

देशातील पहिली यशस्वी खासगी विमानसेवा जेट एअवेजवर गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकट आले होते. जेट एअरवेज हा ब्रँड नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत होते. आर्थिक टंचाईला जेट एअरवेज सामोरे जाताना दिसत होते. मात्र, आता जेट एअरवेज पूर्णपणे बंद होण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. आज, १७ एप्रिल रोजी १२ वाजल्यापासून जेट एअरवेजची सेवा बंद होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जेट मोठ्या आर्थिक संकटावा तोंड देत होती. मात्र, त्या संबंधीत जेट एअरवेजने बँकांकडून ४०० कोटींची मदत मागितली असता. ती मदत मिळाली नसल्याने जेट एअरवेज पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत आर्थिक संकटावर मात करता येत नाही, तोपर्यंत तात्पुरते जेट एअरवेज बंद करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा

नुकतेच जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने उड्डाण बंद करून संप पुकारला होता. तसेच काही दिवसांपूर्वी अचानक कोणत्याही सुचना न देता सर्व आंतरराष्ट्रीय सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. तर जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजेंस अॅण्ड स्टॅटिस्टिक्स कडूनही (डीजीसीआय) जेट विमानांचे उड्डाण नाकारण्यात आले होते. तसेच शिफोल विमामतळावर सुद्धा जेट एअरवेजचे एक विमान जप्त करण्यात आले होते. नवी मुंबई, मुंबई आणि हैदराबाद येथील विमानतळावरील इंधन पुरवठा थांबण्यात आला होता. या सर्व घटनावरून जेट एअरवेजचे अस्तित्व नष्ट होईल की काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. पण आता खरच जेट एअरवेज या बँडला पूर्णविराम लागणार आहे. आज, बुधवारी रात्री १०.३० वाजता जेट एअरवेजचे शेवटचे विमान उड्डाण होणार आहे. मात्र, या कंपनीच्या निर्णयामुळे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे.


हेही वाचा- जेट एअरवेज लवकरच बंद होण्याची शक्यता?


 

First Published on: April 17, 2019 8:21 PM
Exit mobile version