घरमुंबई१ एप्रिलपासून जेट एअरवेजचे कर्मचारी संपावर

१ एप्रिलपासून जेट एअरवेजचे कर्मचारी संपावर

Subscribe

गेले चार महिने अनियमित वेतन मिळत असल्यामुळे जेट एअरवेजच्या वैमानिक आणि अभियंत्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. आगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज आणखी तोट्यात जाण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे वैमानिक १ एप्रिलपासून काम बंद आंदोलन करणार आहेत.

जेट एअरवेजने ३१ मार्चपर्यंतचे थकीत वेतन न दिल्यास हा संप सुरू ठेवण्यात येणार आहे. थकीत वेतन न मिळाल्यास नॅशनल अव्हिएटर्स गिल्ड ने १,१०० वैमानिकांसह आंदोलन करू अशी भुमिका मांडली आहे.

- Advertisement -

 कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजने कर्जातून बाहेर पडण्यासाठी योजनेनुसार कंपनीचे नेतृत्त्वाने एसबीआयकडे धाव घेतली होती. त्यामुळे २९ मार्चपर्यंत निधी हस्तांतरीत होऊन निधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. १ एप्रिलपासून वैमानिक,अभियंते,केबिन क्रू असे सर्व कर्मचारी संपावर जाण्यासाठी ठाम आहेत. त्याचप्रमाणे २०० वैमानिकांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र जेटचे मुख्य अधिकारी विनय दुबे यांना पाठवले आहे. मात्र आपल्याकडे पुरेसे वैमानिक असून, सोमवारी विमानसेवेवर परिणाम होणार नसल्याचा दावा जेट एअरवेज कंपनीने केला आहे.

मात्र अपुऱ्या वैमानिकांचा फटका विमानसेवेवर होणार आहे. दररोजच्या किमान फेऱ्यांमध्ये घट होणार आहे. दररोज मुबई विमानतळावर ९८० विमानं उड्डाण करतात आणि उतरतात. आता मात्र, ही संख्या सध्या ७८० वर पोहोचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -