जिओची नवी शक्कल, रिचार्ज केल्यानंतर मिळणार फ्री टॉकटाईम

जिओची नवी शक्कल, रिचार्ज केल्यानंतर मिळणार फ्री टॉकटाईम

Jio-Logo

जिओने त्याची कॉलिंग पॉलिसी बदलल्याने जिओ ग्राहकांना आता जिओ व्यतिरिक्त इतर ग्राहकांना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट ६ पैसे शुल्क आकारला जाणार आहे. जिओच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दणका दिला. त्यामुळे जिओच्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती. पण, आता नाराजी दूर करण्यासाठी जिओने एक नवी शक्कल लढवली आहे. यापुढे जिओचा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना आता ३० मिनिटांचा फ्री टॉकटाईम मिळणार आहे. पण, याबाबत जिओकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या वृतानुसार, काही ग्राहकांना याबाबतचा अनुभव आला आहे. काही ग्राहकांनी जिओचा नवा रिचार्ज केल्यानंतर त्यांना ३० मिनिटांचा फ्री टॉकटाईमचा मेसेज आला आहे. या टॉकटाईमची वैधता एक आठवडा असणार आहे.

हेही वाचा – काश्मिरींसाठी फोन महत्त्वाचा नाही; दहशतवाद्यांकडून फोनचा वापर – राज्यपाल सत्यपाल मलिक

ग्राहकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

जिओने यापूर्वी पूर्णपणे मोफत कॉलिंगची सुविधा दिली होती. पण, त्यानंतर प्रति मिनिट ६ पैसे शुल्क आकारला जाईल, अशी घोषणा करण्यात आली. जिओ कॉलिंगचे नवे शुल्क आकारणी १० ऑक्टोबरनंतर लागू करण्यात येईल, अशी माहिती जिओने आपल्या युजर्सना दिली होती. पण, आता जिओकडून ग्राहकांना खूष करण्यासाठी आणि नाराजी दूर करण्यासाठी फ्री टॉकटाईम देण्यात येणार आहे. कॉलिंगसाठी शुल्क आकारण्यात येणार, अशी घोषणा केल्यानंतर जिओ धारकांनी जिओ मोबाईलमधून पोर्ट करण्याची धमकी दिली. त्यानंतर ट्विटवर #boycottjio असा हॅशटॅगही ट्रेंड केला होता. ही सर्व नाराजी दूर करण्यासाठी जिओची ही नवीन आयडिया आहे.

First Published on: October 14, 2019 4:26 PM
Exit mobile version