घरदेश-विदेशकाश्मिरींसाठी फोन महत्त्वाचा नाही; दहशतवाद्यांकडून फोनचा वापर - राज्यपाल सत्यपाल मलिक

काश्मिरींसाठी फोन महत्त्वाचा नाही; दहशतवाद्यांकडून फोनचा वापर – राज्यपाल सत्यपाल मलिक

Subscribe

जम्मू काश्मीरच्या प्रशासनाने ५ ऑगस्टनंतर काश्मीरच्या घाटीत मोबाईल सेवा बंद केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

आज जम्मू-काश्मीरच्या घाटीत पोस्टपेड मोबाईल सेवा पूर्ववत करण्यात आली. पण राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांना मोबाईल सेवा महत्त्वाची नसल्याचे म्हटले आहे. एवढ्यावरच न थांबता ते पुढे म्हणाले की, “येथील जनतेपेक्षा दहशतवादीच दूरध्वनी सेवेचा फायदा घेतात.” जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान जम्मू काश्मीरच्या प्रशासनाने ५ ऑगस्टनंतर काश्मीरच्या घाटीत मोबाईल सेवा बंद केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, “यापूर्वी लोक मोबाईलशिवाय जगत होते. तुम्हाला हे समजले पाहिजे की, टेलिफोनचा वापर दहशतवाद्यांची जमवाजमव करण्यासाठी करण्यात येत होता.” ते पुढे म्हणाले की, “लवकरच घाटीत इंटरनेट सेवा सुद्धा सुरु होईल.”

- Advertisement -

दरम्यान आज सोमवारी दुपारपासूनच जवळपास ४० लाख पोस्टपेड मोबाईल सेवा कार्यरत झाल्या आहेत. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करुन जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासीत प्रदेश निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट रोजी या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. परिणामी जम्मू-काश्मीरच्या घाटीत मोबाईल आणि इंटरनेट सेवेवर बंधनं लादण्यात आली होती.

पण १७ ऑगस्टपासून जम्मू-काश्मीर घाटीतील काही टेलिफोन सेवा सुरु करण्यात आल्या होत्या. ४ सप्टेंबर रोजी घोषित केल्याप्रमाणे जवळपास ५० हजार लॅन्डलाईन दूरध्वनी सेवा सुरु करण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

मात्र जम्मूमध्ये वेगळे चित्र होते. नाकेबंदीनंतर काही दिवसांतच जवळपास ऑगस्ट महिन्याच्या १५ दिवसांतच जम्मू मधील मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली होती. तथापि, गैरवापरामुळे १८ ऑगस्टपासून मोबाईलवरील इंटरनेट सेवा पुन्हा खंडित करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -